Jalgaon ATM Crime Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Crime: एटीएम फोडले, कॅश मात्र निघली नाही; सीसीटीव्हीत चोरटा कैद

एटीएम फोडले, कॅश मात्र निघली नाही; सीसीटीव्हीत चोरटा कैद

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : शहरातील रिंग रोडवरील बँक ऑफ बडोदाचे एटीएम मशीन फोडून रोकड चोरण्याचा (Jalgaon News) प्रयत्न केला. मात्र चोरट्याचा प्रयत्‍न अयशस्‍वी झाला. सदरचा प्रकार चोरटा सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाला आहे. (Live Marathi News)

जळगावातील रिंग रोडवरील बडोदा बँकेचे एटीएमच्या कॅबिनमध्ये १५ मार्चला रात्री साडेअकराच्या सुमारास चोरटा शिरल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. चोरट्याने एटीएम मशीनच्या मागील बाजूची पाहणी केली. नंतर मशिनच्या कॅशबॉक्सचा पत्रा उघडून आतील एटीएम हाताने तोडण्याचा प्रयत्न केला. एटीएम मशीन फोडण्यात अयशस्वी झाल्याने चोरटा पसार झाला. हा प्रकार गुरुवारी (ता. १६) सकाळी उघडकीला आला. जिल्हापेठ ठाण्याचे (Police) पोलिस कर्मचारी समाधान पाटील आदी घटनास्थळी पोचले व त्यांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. याबाबत बँक मॅनेजर पवन मोंगळे यांच्या तक्रारीवरून रात्री जिल्हापेठ पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

रोकड सुरक्षित

बडोदा बँकेच्या व्यवस्थापकांना माहिती कळताच त्यांनी वरिष्ठांना कळवून एटीएम देखभाल दुरुस्ती करणाऱ्या एजन्सीला पाचारण केले. एटीएमच्या कॅशबॉक्सपर्यंत चोरटा पोचला. मात्र, ते तो उघडू शकला नाही. परिणामी, लाखो रुपयांची रोकड सुरक्षित असल्याचे तपासणीत आढळले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gas pain vs heart attack: सारखं छातीत दुखतंय....अॅसिडिटी की हार्ट अटॅकचं लक्षण? सोप्या भाषेत फरक समजून घ्या

Maharashtra Live News Update : कोल्हापुरातील संभाजीनगर परिसरात पोलीस बंदोबस्तात गॅस वितरण

Mumbai: गॅस सिलिंडरचा तुटवडा, भाजी मार्केटला फटका; ग्राहकांनी भाजी खरेदीकडे फिरवली पाठ

Nashik Tourism: नक्कीच माथेरान-महाबळेश्वर विसराल, नाशिकपासून ४५ किमी दूर आहे हे सुंदर हिल स्टेशन

Jio Recharge : जिओचा स्वस्त रिचार्ज प्लान, 336 दिवसांची वैधता अन् अनलिमिटेड कॉलिंग, जाणून घ्या किंमत

SCROLL FOR NEXT