कौटुंबिक वादातून पतीने पत्नीची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली.
दारूच्या नशेत आरोपीने कोयत्याने सपासप वार केल्याचा आरोप आहे.
मानेवर गंभीर वार झाल्याने महिलेचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
संजय महाजन, साम प्रतिनिधी
कौटुंबिक वादातून पतीने दारूच्या नशेत आपल्या पत्नीची कोयत्याने निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना नशिराबाद येथील खंडेराव मंदिर परिसरात घडली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मंदाबाई जाधव असं मृत महिलेचं नाव आहे. आरोपी पतीचे नाव विकास जाधव आहे.
दोघांमध्ये कौटुंबिक वाद झाला, त्याच वादातून विकास जाधव याने आपल्या पत्नीवर कोयत्याने सपासप वार करत तिचा खून केला. मानेवर वार झाल्यानं मंदाबाई यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. हत्येच्या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. आरोपी विकास जाधव हा घटनास्थळावरून पसार झाला होता.
मृत मंदाबाई या नशिराबाद येथील रहिवासी असून त्या रामा सोमा बागले यांची कन्या होत्या. त्यांचा विवाह रायपूर येथे झाला होता. मात्र काही दिवसांपासून पती-पत्नी नशिराबाद येथे वास्तव्यासाठी आले होते. या प्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, घटनेमागील नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे.
बंगळूरुतील महादेवपुरा परिसरातही एका हत्येची घटना घडली होती. एका होमगार्ड महिलेचा तिच्याच पतीने निर्घृणपणे हत्या केल्याची घटना काही दिवसापूर्वीच घडली होती. या हत्येमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृत महिलेचे नाव मंजुळा (वय32) असे असून त्या महादेवपुरा पोलीस ठाण्यात होमगार्ड म्हणून कार्यरत होत्या, आरोपी पतीचे नाव प्रदीप असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदीप याला ऑनलाइन बेटिगचे व्यसन लागले होते. या व्यसनामुळे त्याचे आर्थिक तसेच कौटुंबिक वाद होत होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.