Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News : दुर्दैवी..देवीची आरास करताना तरुणाचा मृत्यू; लाइटिंग टाकताना लागला विजेचा झटका

Jalgaon News : घटस्थापना एका दिवसावर असल्याने मंडळांची तयारी सुरु होती. त्यानुसार गावात देवीची प्रतिष्ठापना करायची असल्याने गावातील तरुण मिळून सर्व तयारी करत होते.

Rajesh Sonwane

चोपडा (जळगाव) : घटस्थापनेची तयारी सगळीकडे सुरु आहे. देवीची स्थापना करण्यापूर्वी मंडळाचे कार्यकर्ते मंडप उभारणी करून सजावटीचे काम करत होते. याच दरम्यान लाइटिंग लावत असताना विजेचा जोरदार झटका बसल्याने मंडपातच तरुणाचा मृत्यू झाला. सदरची दुर्दैवी घटना चोपडा तालुक्यातील गरताड येथे रात्रीच्या सुमारास घडली. 

चोपडा (Chopda) तालुक्यातील गरताड येथील केतन समाधान पाटील (वय १९) असे मृत तरुणाचे नाव आहे. घटस्थापना एका दिवसावर असल्याने मंडळांची तयारी सुरु होती. त्यानुसार गावात देवीची प्रतिष्ठापना करायची असल्याने गावातील तरुण मिळून सर्व तयारी करत होते. त्यानुसार चोपडा येथील फार्मसी महाविद्यालयात शिकत असलेला केतन हा दुर्गा देवीच्या घटस्थापनेची तयारी करीत होता. मंडळातील सर्व कार्यकर्ते मिळून काम करत असताना केतन हा लायटिंग टाकल्याचे काम करत होता. त्याचवेळी त्याला (Electric Shock) विजेचा जबर धक्का लागल्याने त्याचा मृत्यू झाला. 

एकुलता एक मुलगा गेला 

केतन हा समाधान मधुकर पाटील यांचा एकुलता एक मुलगा होता. मुलाचा मृत्यू झाल्याचे समजताच कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. तर घटस्थापनेच्या आदल्या दिवशीच ही दुर्दैवी घटना घडल्याने गरताड गावावर शोककळा पसरली असून गावात शांतता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: गुजरातकडे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सचा चाळीसगावात अपघात

भयंकर! ७ वर्षांची मुलगी शेजारी झोपलेली असतानाच पत्नीचा गळा चिरून खून; नंतर पतीने मेट्रोसमोर उडी मारून संपवलं आयुष्य

Health Care : महिनाभर चहा पिणे बंद केल्यास शरीरात कोणते बदल होतात? वाचा

एकनाथ शिंदेंच्या आमदाराने कंत्राटदाराकडून ४० लाखांची लाच घेतली? व्हिडीओने महाराष्ट्रात खळबळ

Maharashtra Rain : वादळी पावसाचा इशारा; विदर्भ आणि कोकणात 'येलो-ऑरेंज' अलर्ट, जाणून घ्या आजचा हवामान अंदाज

SCROLL FOR NEXT