Crime News Saam tv
महाराष्ट्र

Crime News : तरुणाची निर्घृण हत्या; चोपडा तालुक्यात महिनाभरात तिसऱ्या घटनेने खळबळ

Jalgaon News : चोपडा तालुक्यातील अडावद गावातील भगवाननगरमधील मोकळ्या जागेवर तरुणाचा खून झाल्याची घटना सकाळी उघडकीस आली.

Rajesh Sonwane

अडावद (जळगाव) : चोपडा तालुक्यातील अडावद या गावात काही अज्ञातांनी तरुणाची दगडाने व लाकडी दांड्याने मारहाण करत तरुणाची हत्या केल्याची घटना उघडकीस आली. महिनाभरात खुनाची ही तिसरी घटना असून या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणी काही संशयितांना चौकशीसाठी पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले आहे. 

चोपडा तालुक्यातील अडावद गावातील भगवाननगरमधील मोकळ्या जागेवर तरुणाचा खून झाल्याची घटना सकाळी उघडकीस आली. पोलिसांना घटनेची माहिती कळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ, उपनिरीक्षक राजू थोरात यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. डोक्यावर दगडाने वर केले असल्याने तरुणाची ओळख पटत नव्हती. मात्र पोलिसांच्या तपासात मृत हा गावातीलच लोखंडेनगरातील बापू हरी महाजन (वय ३५) असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्या डोक्यावर, तसेच तोंडावर गंभीर जखमेच्या खुणा होत्या. 


खुनाचा तपास करण्यासाठी श्वानपथकाला पाचारण केले. श्वानाने मारेकऱ्यांचा माग दाखविला असता त्यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. दरम्यान काही जणांवर संशय असल्याने पोलिसांनी काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मित्रानेच खुपसला भारताच्या पाठीत खंजीर, भारतीय तेल टँकरवर इराणची फायरिंग

Bigg Boss Marathi 6 Grand Finale : बिग बॉस मराठीच्या घरातील 'रणरागिणी' चा पत्ता कट; शेवटच्या क्षणी बाजी पलटली | VIDEO

अमेरिका इराण युद्ध पुन्हा भडकणार? होर्मुझवरुन इराणचा अमेरिकेला इशारा

TCS धर्मांतर प्रकरणानंतर मुंबईतही धक्कादायक प्रकार; प्रेमाच्या बहाण्याने १६ वर्षीय तरुणीला पळवलं

Maharashtra News Live Update: नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी आवकाळी पाऊस

SCROLL FOR NEXT