Chopda Accident Saam tv
महाराष्ट्र

Chopda Accident : मनुदेवीच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; दोन सख्ख्या भावांसह एकाचा मृत्यू

Jalgaon News : धुळे जिल्ह्यातील निजामपूर येथील वाणी कुटुंब हे यावल तालुक्यातील सातपुडा निवासिनी मनुदेवी याठिकाणी नवरात्रीमध्ये दरवर्षी भंडारा देत असतात.

Rajesh Sonwane

चोपडा (जळगाव) : नवरात्रोत्सव असल्याने देवीच्या दर्शनाला भाविक जात आहेत. अशाच प्रकारे सातपुड्यात वसलेल्या मनुदेवीचे दर्शन व भंडारा देण्यासाठी भाविकांवर काळाने घाला घातला. यावल- चोपडा रस्त्यावर कारचे टायर फुटल्याने झालेल्या अपघातात धुळे जिल्ह्यातील निजामपूर येथील तीन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. तर कारचालक गंभीर जखमी आहे. 

धुळ्याच्या साक्री तालुक्यातील निजामपूर येथील वाणी कुटुंब हे यावल तालुक्यातील सातपुडा निवासिनी मनुदेवी याठिकाणी नवरात्रीमध्ये दरवर्षी भंडारा देत असतात. त्यानुसार नवरात्री सुरु असल्याने ठरल्याप्रमाणे मंगळवारी (८ ओक्टोम्बर) वाणी कुटुंबातील शैलेश श्रीधर वाणी (वय ३४), निलेश श्रीधर वाणी (३०) हे दोन भाऊ आणि त्यांच्या सोबत जितेंद्र मुरलीधर भोकरे (वय ४७) हे कारने मनुदेवी येथे भंडारा देण्यासाठी सकाळी मार्गस्थ झाले होते. मात्र मनुदेवी मंदिर काही किलोमीटर अंतरावर असतानाच त्यांच्या कारचा अपघात (Accident) झाला. 

चोपडा- यावल मार्गावरील मजरेहोळ फाट्याजवळ कारचा अपघात झाला. खराब रस्ता असल्याने कारचे आधी मागचे आणि नंतर पुढचे (Chopda) असे दोन्ही टायर फुटले. यामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार समोरून येणाऱ्या बसवर आदळली. यात मागे बसलेले शैलेश वाणी, निलेश वाणी व जितेंद्र भोकरे या तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर चालक गंभीर जखमी आहे. लागलीच त्याला चोपडा उप जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भररस्त्यात खासदाराला मारहाण; शर्ट फाडून खाली पाडले, धक्कादायक व्हिडिओ समोर

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा फॉर्म पुन्हा सुरू होणार का? महत्त्वाची अपडेट आली समोर

IPL Winner Prize Money 2026: IPLच्या विजेत्या संघावर होणार पैशांचा पाऊस; रनर-अपला किती मिळेल पैसा?

Naga Chaitanya: नागा चैतन्यने समंथाचं करियर खराब केलं; अभिनेत्यावर गंभीर आरोप, प्रकरण थेट हायकोर्टात पोहोचलं

IT मॅनेजरचा जॉब सोडला अन् महिला झाली रिक्षाचालक, महिन्याची कमाई किती?

SCROLL FOR NEXT