Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News : मतदान ड्युटी करून घरी जाताना शिक्षकावर काळाचा घाला; चोपडा- शिरपूर मार्गावर मोटारसायकलला अपघात

jalgaon News : विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात काल मतदानाची प्रक्रिया पार पडली. यासाठी शिक्षक व प्रशासनातील कर्मचाऱ्यांची मतदान केंद्रांवर ड्युटी लावण्यात आली होती

Rajesh Sonwane

जळगाव : विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया काल पार पडली. यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानुसार मतदान केंद्रावरील आपली ड्युटी संपल्यानंतर घरी जाणाऱ्या शिक्षकाचा अपघातात मृत्यू झाला. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. 

चोपडा- शिरपूर मार्गावर सदरची घटना रात्रीच्या (Chopda) सुमारास घडली. लक्ष्मीकांत वासुदेव पाटील उपशिक्षक (बी.एल.ओ.) अनवर्दे -बुधगांव (वय ४९, रा. बभळाज ता. शिरपूर) असे मृत कर्मचाऱ्यांचे नाव आहे. विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात काल मतदानाची प्रक्रिया पार पडली. यासाठी शिक्षक व प्रशासनातील कर्मचाऱ्यांची मतदान केंद्रांवर ड्युटी लावण्यात आली होती. त्यानुसार लक्ष्मीकांत पाटील यांची अनवर्दे -बुधगांव येथे बीएलओ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.  

घरी परतताना अपघात दिवसभर मतदान केंद्रावर कर्तव्य बजावून झाल्यानंतर सर्व साहित्य रवाना केल्यानंतर लक्ष्मीकांत पाटील हे रात्री (बभळाज ता. शिरपूर) येथे घरी जाण्यासाठी निघाले. याच दरम्यान त्यांच्या मोटरसायकलचा चोपडा- शिरपूर रस्त्यावरील गलंगी चौकात (Accident) अपघात होऊन त्यात त्यांचा मृत्यू झाला. दुर्दैवी घटनेसंदर्भात जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

इराणमध्ये अमिरेकन लढाऊ विमान कोसळलं, पायलटला पकडण्यासाठी बक्षीस केलं जाहीर, VIDEO

Fact Check: केंद्र सरकारची वर्क फ्रॉम होम योजना? महिलांना 25 हजार मानधन मिळणार?

Ashok Kharat: मुलानेच उघड केलं खरातचं हवाला कांड? चौकशीदरम्यान SIT ला सांगितली धक्कादायक माहिती

अवकाळी पावसाने वाजवले स्मार्ट सिटीचे तीनतेरा; स्मार्ट सिटी की 'नरक' सिटी, पुणेकरांचा संताप

Earthquake: दिल्लीसह उत्तर भारत भूकंपाच्या धक्क्याने हादरला, नागरिक घाबरून घराबाहेर पळाले; VIDEO समोर

SCROLL FOR NEXT