death 
महाराष्ट्र

त्‍या घटनेने अंध वडीलांचा आधार हिरावला; बंधाऱ्यात बैलगाडी उलटली

त्‍या घटनेने अंध वडीलांचा आधार हिरावला; बंधाऱ्यात बैलगाडी उलटली

साम टिव्ही ब्युरो

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : बैलगाडीने धाब्यावर टाकण्यासाठी खारी माती घेऊन घराकडे येत असताना सतारी नाल्याच्या बंधाऱ्यात बैलाचा पाय सटकल्याने बैलगाडी उलटून दोघे आतेभाऊ व मामेभाऊ यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना सायगाव (ता. चाळीसगाव) येथे घडली. घटनेनंतर सायगाव गावावर शोककळा पसरली आहे. jalgaon-chalisgaon-news-two-brother-water-drowned-and-death

सायगाव येथील राकेश चिला अहिरे (वय १९), सुकदेव जगन जाधव (१८) हे दोघेही आतेभाऊ-मामेभाऊ सायगाव-नादगाव रस्त्यालगत असलेल्या सतारी शिवारात दुपारी चारच्या सुमारास बैलगाडीने धाब्यावर टाकण्यासाठी लागणारी खारी माती घेण्यासाठी गेले होते.

चटका लावणारा मृत्यू

राकेश व सुकदेव हे दोघेही खारी मातीची बैलगाडी भरून सतारी नाल्याच्या बंधाराच्या पाण्यातून घरी येत असताना बैलाचा पाय पाण्यात सटकला व बैलगाडी पाण्यात उलटली. बैलगाडीवर बसलेले दोघेही पाण्यात पडले. त्या ठिकाणी शेळ्या चारणाऱ्या व्यक्तीने त्यांना पाहिले. त्याने लगेच गावात भ्रमणध्वनीवर कळविले व दोघांनाही पाण्यातून बाहेर काढले. त्यांना तातडीने खासगी वाहनाने चाळीसगावला खासगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले. या दोघांचे चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात विच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी सतीश महाजन यांनी दिलेल्या माहीतीवरून मेहुणबारे पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली.

अंध वडिलांचा आधार गेला

राकेश पिलखोड येथे औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात शिक्षण घेत होता. आई- वडिलांना तो एकुलता एक असून, त्याचे वडील अंध आहेत. दुसरा सुकदेव व राकेश दोघे आतेभाऊ मामेभाऊ होते. या दोघांचा मृतदेह पाहून आई- वडिलांनी एकच आक्रोश केला. हे दृश्‍य पाहून अनेकांचे डोळे पाणावले. या दोघांवर रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

Anganwadi Nutrition Food : पोषण आहारात गडबड आढळली तर खैर नाही! आदिती तटकरे यांचा अधिकाऱ्यांना इशारा

Kissing Car : साडेतीन तासांत कारवर ३४०० 'Kisses'! रीलचा नाद पडला महागात, पोलिसांनी केली कारवाई

डोंबिवलीत भाजप अन् मनसेत 'डिजिटल युद्ध'! एआय व्यंगचित्रं आणि मीम्सच्या माध्यमातून थेट नेत्यांवर निशाणा

SCROLL FOR NEXT