Chalisgaon News Saam tv
महाराष्ट्र

वाळूची चोरटी वाहतूक; ट्रॅक्टरसह चार लाखाचा मुद्देमाल जप्‍त

वाळूची चोरटी वाहतूक; पोलिसांनी ट्रॅक्टर घेतले ताब्‍यात

साम टिव्ही ब्युरो

चाळीसगाव (जळगाव) : अवैध वाळूची वाहतूक सुरूच आहे. अशी वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला चाळीसगाव शहर पोलिसांनी (Police) आज पकडले असून चालकाला अटक करत ट्रॅक्टर ताब्‍यात घेतले आहे. (jalgaon chalisgaon news Smuggling of sand Police seized the tractor)

चाळीसगाव (Chaligaon) तालुक्यातील डेराबर्डीकडून शहराकडे येत असलेल्‍या विना नंबरच्या ट्रॅक्टरवर पोलिसांना संशय आला. यावेळी पोलिसांनी ट्रॅक्टरला थांबवून चौकशी केली असता ट्रॉलीत ७ हजार रुपये किंमतीची सव्वा ब्रास गौन खनिज (वाळू) मिळून आला. निखिल सुनील कुढे (वय २३) असे अटक केलेल्‍या चालकाचे नाव आहे.

चार लाखाचा मुद्देमाल जप्‍त

शहर पोलिसांनी चालकाला (Jalgaon News) ताब्यात घेऊन ३ लाख ५० हजार रुपये किमतीचा ट्रॅक्टर, ५० हजार रुपये किमतीची ट्रॉली व ७ हजार रूपये किंमतीची वाळू असे एकूण ४ लाख ७ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर कारवाई पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज (१२ मे) सकाळी ७ वाजताच्या सुमारास केली. या कारवाईमुळे वाळू तस्करी करणाऱ्यांच्या गोटात चांगलीच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे आणि सरकार मधील कोंडी उपोषणाच्या 12 व्या दिवशीही कायम

Bigg Boss 20 : पहिल्या आठवड्यात नॉमिनेट झाले 'हे' स्पर्धक; घराला कोण करणार टाटा-बाय बाय? खेळाची रंगत वाढतेय

Ladki Bahin Yojana: 'या' महिलांच्या खात्यात जमा होणार ऑगस्टचे ₹१५००; यांचे पैसे कायमचे होणार बंद, पाहा महत्त्वाची अपडेट

Hemraj Shah : मोठी बातमी! ठाकरेसेनेच्या नेत्याचे मुंबईत निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

मोठी बातमी: लंडनमध्ये ऐनवेळी विमानांचे मार्ग बदलले! उपमुख्यमंत्र्यांचे ६ अधिकारी स्वित्झर्लंडमध्ये अडकले; काय घडलं?

SCROLL FOR NEXT