Chalisgaon News Saam tv
महाराष्ट्र

Chalisgaon News : शेतात बिबट्या दिसताच जीव वाचविण्याचा प्रयत्न; विहिरीत पडल्याने तरुणीचा मृत्यू

Jalgaon News : चाळीसगाव तालुक्यातील तांबोळे शिवारात सदरची घटना घडली. ग्रामीण भागात सध्या बिबट्याचा वावर वाढला आहे.

Rajesh Sonwane

चाळीसगाव (जळगाव) : शेतात कापूस वेचणीचे काम सुरु होते. कापूस वेचणी करत असताना दूर अंतरावर बिबट्‍या निदर्शनास दिसला. बिबट्या आपल्या दिशेने येईल व हल्ला करेल या भीतीतून तरुणी घराकडे धावत सुटली. मात्र घाबरलेली तरुणी पाय घसरुन विहिरीत पडली. यात तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 

चाळीसगाव (Chalisgaon) तालुक्यातील तांबोळे शिवारात सदरची घटना घडली. ग्रामीण भागात सध्या बिबट्याचा वावर वाढला आहे. यामुळे शेतकरी व मजुरांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तालुक्यात एकापाठोपाठ हल्ल्याच्या घटना घडून बिबटे पिंजऱ्यात अडकत असतानाही शेत शिवारांमध्ये (Leopard) बिबट्‍याचे दर्शन होत आहे. याच दरम्यान तांबोळा (ता. चाळीसगाव) शेतशिवारात देखील बिबट्याचे दर्शन झाले. 

तांबोळा येथील शेतकरी विजय विक्रम पाटील यांच्या शेतात १९ नोव्हेंबरला काही महिला कापूस वेचणीचे काम करीत होत्या. तर शेतात विजय पाटील यांचा मुलगा व मुलगी देखील होते. सकाळी दहाच्या सुमारास स्नेहल विजय पाटील (वय १८) ही तरुणी भावासह शेताजवळच्या विहिरीवर पाणी घेण्यासाठी गेली होती. तिला अचानक बिबट्या दिसल्याने तिने जोरात आरोळी मारली. त्याचवेळी तिच्या भावाने कापूस वेचणी करणाऱ्या महिलांकडे धाव घेतली. 

मात्र स्नेहल विहिरीजवळ असतानाच तिचा अचानक पाय घससरला ती विहिरीत पडली. हा प्रकार समजताच आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी विहिरीकडे धाव घेतली. पाटणा तांडा (ता. चाळीसगाव) येथील पट्‍टीचे पोहणारे कैलास चव्हाण याना बोलावून स्नेहलचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला. चाळीसगाव ग्रामीण रूग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. याबाबत ग्रामीण पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saam Impact: भ्रष्ट अधिकाऱ्यांना आता दे धक्का! 314 अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या रडारवर

Buldhana News: रस्त्यावरच महिलेची प्रसूती, मदतीसाठी कुणीच येईना; रुग्णालयाने नकार दिला, शेवटी...

रात्री झोपताना कंबर आणि पायाचा घोटा दुखतायत? तुमच्या दैनंदिन वापरातील 'ही' वस्तू ठरू शकते कारण

Maharashtra News Live Update: चितेगाव टोलनाक्याजवळ दोन कारची जोरदार धडक; जीवितहानी टळली

Crime: रायगड हादरले! १६ वर्षीय मुलीवर बलात्कार, मित्रानेच केलं भयंकर कृत्य

SCROLL FOR NEXT