Chalisgaon Crime News Saam tv
महाराष्ट्र

Chalisgaon Crime News: नात्‍याला काळीमा..पत्‍नी आजारी असताना जन्‍मदात्‍या बापानेकडून नऊ वर्षीय मुलीवर अत्‍याचार

नात्‍याला काळीमा..पत्‍नी आजारी असताना जन्‍मदात्‍या बापानेकडून नऊ वर्षीय मुलीवर अत्‍याचार

साम टिव्ही ब्युरो

चाळीसगाव (जळगाव) : तालुक्यातील एका गावात नात्याला काळिमा फासणारी (Chalisgaon) घटना घडली आहे. जन्मदात्या बापानेच आपल्या नऊ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याच्या घटनेने संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणी सोमवारी (ता. ५) दुपारी गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी (Police) संशयितास ताब्यात घेतले आहे. (Live Marathi News)

चाळीसगाव तालुक्यातील एका गावातील मजूर कुटुंबातील नराधम बापाने त्याची पत्नी आजारी असताना तिला नजीकच्या घरात डॉक्टरांनी सलाईन लावली होती. या वेळी नराधम बाप आपल्या मुलीसोबत घरात झोपला होता. मुलगी एकटी असल्याचा फायदा घेत या नराधम (Crime News) बापाने मुलीवर अत्याचार केला. सलाईन संपल्यावर आई जेव्हा घरी आली, त्यावेळी मुलीने आईला सर्व आपबीती सांगितली. यानंतर त्याच्या पत्नीने शहर पोलिस ठाण्यात धाव घेत आपल्या पती विरुद्ध तक्रार दिली.

तक्रारीवरून पोलिसांनी नराधम बापाविरोधात गुन्हा दाखल करून संशयितास ताब्यात घेतले आहे. पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सचिन कापडणीस तपास करीत आहेत. या पूर्वी देखील दीड, दोन महिन्यांपूर्वी या नराधम बापाने त्याच्या मुलीवर अत्याचार केल्याचे सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पोलीस खात्यात बदल्यांचा 'पार्ट-२'! एका अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली, दुसऱ्याची बदलीनंतरही 'तीच' खुर्ची कायम

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिर्डी विमानतळावर दाखल

Raksha Bandhan 2026: रक्षाबंधनाला सोने-चांदीची राखी बांधावी का? जाणून घ्या पारंपारिक धाग्याच्या राखीचे खास महत्त्व

केंद्र सरकारच्या ५४ वेबसाइट्सवर हल्ला! तपासाचे धागेधोरे थेट पुण्याच्या जुन्नरमध्ये; मनी ट्रान्सफर कनेक्शनमुळे खळबळ

Pune Traffic Update : पुणेकरांनो उद्या घराबाहेर पडण्यापूर्वी 'हे' वाचा! ईदमुळे शहरातील वाहतुकीत मोठे बदल

SCROLL FOR NEXT