Chalisgaon Accident Saam tv
महाराष्ट्र

Chalisgaon Accident : आजोबांसोबत गेलेल्या बालकाला कंटेनरने चिरडले; संतप्त गावकऱ्यांचा रास्ता रोको 

Jalgaon News : आजोबा त्याला चॉकलेट घेऊन देत असताना जीवन रस्‍त्याच्या बाजूला उभा होता. त्याचवेळी हिरापूर रोडकडून भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने जोरदार धडक दिली.

Rajesh Sonwane

तरवाडे (चाळीसगाव) : आजोबांसोबत फिरायला गेलेल्या तीन वर्षीय बालकाला भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनरने चिरडल्याची घटना चाळीसगाव तालुक्यातील तळेगाव येथे घडली. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी कंटेनरची तोडफोड करीत रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. याप्रकरणी ग्रामीण पोलिसात कंटेनर चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तळेगाव (ता. चाळीसगाव) येथे हा अपघात १३ जुलैला सकाळी अकरा वाजेच्या सुमारास घडला. गावातील (chalisgaon) सचिन जगन्नाथ गोरे यांचा मुलगा जीवन (वय ३) हा त्याचे बाबा जगन्नाथ गोरे यांच्यासोबत १३) सकाळी बसस्थानकावर आलेला होता. आजोबा त्याला चॉकलेट घेऊन देत असताना जीवन रस्‍त्याच्या बाजूला उभा होता. त्याचवेळी हिरापूर रोडकडून भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने जोरदार धडक (Accident) दिली. यात जीवन हा पुढील चाकाखाली दाबला गेला. ग्रामस्थांनी जीवनला कंटेनर खालून काढून तळेगाव आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेतून तत्काळ चाळीसगावला ग्रामीण रुग्णालयात आणले असता, डॉक्टरांनी तपासून तो मयत झाल्याचे सांगितले.

कंटेनर अडवून चालकाला दिला चोप 
अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी कंटेनर चालक लक्ष्मण फोरन सिंग (रा. बढा खुर्द कारस, जि. अलिगड, उत्तरप्रदेश) याला चांगलाच चोप दिला. तर जमावाने कंटेनरची देखील तोडफोड केली. या घटनेची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र संतप्त ग्रामस्थ ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. जोपर्यंत रस्त्यावर गतिरोधक टाकले जात नाही, तोपर्यंत एकही वाहन रस्त्‍याने जाऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यामुळे नांदगाव रस्त्यावर दूरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार इद्रिस नायकवडी यांची जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीतून माघार

Mangalsutra Designs: महिलांसाठी मॉडर्न मंगळसूत्राचे लेटेस्ट पॅटर्न, ५ डिझाईन्स आहेत ट्रेंडमध्ये

Gold Price Today: जळगावच्या सुवर्ण बाजारासाठी दसरा ठरला निरस; सोन्याचे भाव घसरूनही उलाढालीत १५ टक्क्यांची घट; आजचे दर किती?

MHT-CET Exam 2027 : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! MHT CET ची परीक्षा कधी होणार? सीईटी सेलची महत्त्वाची माहिती

Carpet Cleaning : घाणेरडे कार्पेट स्वच्छ करण्यासाठी एकही रुपया खर्च नको! घरच्या घरी ड्राय क्लीनिंग करण्याच्या 3 सोप्या स्टेप्स

SCROLL FOR NEXT