Bus Accident Saam tv
महाराष्ट्र

Bus Accident : बसचा मोठा अपघात टळला; समोरून येणाऱ्या वाहनाला वाचविण्यात बस उलटली

Jalgaon News : उधना ते जामनेर हि बस अशी प्रवास करतांना पारोळा बसस्थानकावरून निघून भडगावच्या दिशेने मार्गस्थ झाली

Rajesh Sonwane, संजय महाजन

जळगाव : महामार्गाने बस मार्गस्थ झाली असताना समोरून ओव्हरटेक करत येत असलेला ट्रकची धडक वाचविण्याच्या प्रयत्नात बसचा अपघात झाला. बस चालकाने प्रसंगावधान राखल्याने बस रस्त्याच्या कडेला उलटली असून यात दोन प्रवाशी जखमी झाले आहेत. सदरचा अपघात भडगावच्या पुढे घडला. 

पारोळा (Parola) तालुक्यातील वाघेरी येथे हा अपघात घडला आहे. पारोळा- भडगाव रस्त्यावरील वाघरी फाट्याजवळील पॉलिटेक्निक कॉलेज समोर उधना ते जामनेर हि बस अशी प्रवास करतांना पारोळा बसस्थानकावरून निघून भडगावच्या दिशेने मार्गस्थ झाली. दरम्यान पारोळा- भडगाव रस्त्यावरील वाघरा- वाघरी फाट्या समोरून येणारा चालक हा महिंद्रा पिकअपला ओव्हरटेक करीत होता. भरधाव वेगाने येत असल्याने (Bus Accident) बसला धडकणार होती. 

मात्र बस चालकाने प्रसंगावधान राखत बसवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला. मात्र बसचा वेग देखील अधिक असल्याने रस्त्याच्या खाली जाऊन पलटी झाली. या अपघातात चालक, वाहक तसेच प्रवाशी जखमी झाले आहे. बस चालकाच्या नियंत्रणामुळे मोठा अनर्थ टळला आहे. याबाबत पारोळा पोलिसात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ठाण्याच्या जून्या कोपरी पुल आठ दिवस वाहतूकीसाठी बंद...

Bigg Boss 19 : सलमान खानच्या 'बिग बॉस 19'ची पहिली झलक; चक्क लोगो बदलला, पाहा VIDEO

Avoi Snacks: चहासोबत बिस्किटे, ब्रेड किंवा पकोडे खाणे का टाळावे? जाणून घ्या आरोग्यावर होणारे परिणाम

मंत्रालयातील ठरावीक अधिकाऱ्यांच्या फायद्यासाठी निकषात बदल, उपसचिवांमध्ये संताप; न्यायालयात जाण्याचा इशारा

Manikrao Kokate: इडापिडा टळो, संकट दूर होवो; माणिकराव कोकाटे शनिदेवाच्या चरणी लीन|VIDEO

SCROLL FOR NEXT