Bhusawal News Saam tv
महाराष्ट्र

Bhusawal News : दुचाकी पुलावर लावून नदीत घेतली उडी; तरुणाचा शोध सुरु

Jalgaon News : लखन कोळी हा मंगळवारी दुपारी साडेतीनला मोटरसायकल घेऊन भुसावळला गेला. यानंतर त्याने भुसावळ जवळील तापी नदीच्या पुलावर मोटरसायकल लावली व तेथून नदीपात्रात उडी घेतली

Rajesh Sonwane

यावल (जळगाव) : घरातून बाहेर जात असल्याचे सांगून दुचाकी घेऊन निघाला. यानंतर तापी नदीच्या पुलावर आला असता दुचाकी उभी करून तरुणाने पुलावरून तापी नदीत उडी घेतली. हि घटना भुसावळ शहरालगत असलेल्या तापी नदीच्या पुलावर घडली आहे. 

यावल (Yawal) शहरातील बोरावल गेट परिसरातील लखन संजय कोळी (वय २८) असे या तरुणाचे नाव आहे. लखन हा आई-वडील, पत्नी व दोन मुलांसह राहत होता. लखन कोळी हा मंगळवारी दुपारी साडेतीनला मोटरसायकल घेऊन भुसावळला (Bhusawal) गेला. यानंतर त्याने भुसावळ जवळील तापी नदीच्या पुलावर मोटरसायकल लावली व तेथून नदीपात्रात उडी घेतली. हा प्रकार नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तातडीने फैजपूर पोलिसांना माहिती दिली. 

घटनेची माहिती मिळताच फैजपूर पोलिसांनी घटनास्थळ गाठले. सदर तरुण यावल शहरातील बोरावल गेट भागातील असल्याचे समजतात शहरातील अनेक नागरिकांनी नदीपात्राकडे धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध नदीत सुरू होता. मात्र तो आढळून आला नाही. आज सकाळी पुन्हा नदीपात्रात त्याचा शोध घेण्यास सुरवात करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नागपूरच्या ऐतिहासिक मारबत उत्सवाच्या पार्श्वभूमीवर डीजेच्या आवाजाची चाचपणी...

Sambhjinagar News : संपूर्ण कुटुंबाला डेंग्यूची लागण, वडील अन् बहीण ICU मध्ये दाखल, १२ वर्षाच्या पोटच्या मुलाचा मृत्यू

Diabetes Diet : डायबिटीजच्या रुग्णांनी केळी खावी की टाळावी? जाणून घ्या किती प्रमाणात खाणे योग्य

Konkan Fort : समुद्राच्या लाटांशी झुंज देत आजही दिमाखात उभा! कोकणात लपलाय १७व्या शतकातील 'हा' भव्य किल्ला

Golden Ring Road: १७३ किमीचा महामार्ग, ८ कमर्शियल हब; नागपूरचा ‘गोल्डन रिंग रोड’ ठरणार गेमचेंजर! कसा असेल मुख्यमंत्र्यांच्या ड्रीम प्रोजेक्ट?

SCROLL FOR NEXT