Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News: दुपारी घरातून निघालेली विवाहिता सायंकाळी आढळली जळालेल्या अवस्‍थेत

दुपारी घरातून निघालेल्‍या विवाहिता सायंकाळी आढळली जळालेल्या अवस्‍थेत

साम टिव्ही ब्युरो

भडगाव (जळगाव) : येथील विवाहिता कोठली रस्त्यावरील ओम शांती केंद्र परीसरात जळालेल्या अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबड उडाली आहे. या घटनेबाबत अनेकविध चर्चांना ऊत आला आहे. घटना समोर आल्यावर(Police) पोलीसांनी तातडीने तपासाची चक्रे वेगाने फिरवायला सुरवात केली आहे. (Letest Marathi News)

चाळीसगाव (Chalisgaon) रस्त्यावरील मयुरेश मार्बलच्या मागील रहिवाशी असलेली विवाहीता काल दुपारी दोनच्या सुमारास चाळीसगाव रस्त्या लगत असलेल्या कॉलनी भागात राहणाऱ्या भावाकडे जाऊन येते असे सांगून घरातुन गेली. त्यानंतर पाच ते पाऊणेसहा वाजेच्या दरम्यान सदर महिला कोठली रस्त्यालगत असलेल्या ओम शांती केंद्राच्या मागील बाजूस जळालेल्या अवस्थेत आढळून आली.

कॉलनी भागालगत असलेल्या एका शेतकऱ्याच्या सालदाराचे या महिलेकडे लक्ष गेले. त्यानंतर हे प्रकरण समोर आले. त्यानंतर त्या महिलेकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्या घरी निरोप देण्यात आला. ते तेथे पोहोचल्यानंतर महिलेला दवाखान्यात (Hospital) दाखल करण्यात आले. मात्र तेथून जळगाव येथील एका खासगी दवाखान्यात हलविण्यात आल्याचे नातेवाईकांकडून सांगण्यात आले आहे. सदरची महिला 50-70 टक्के भाजल्याचे सांगण्यात येत आहे. सदर महीलेचा जबाब घेण्याचे काम पोलीसांकडून घेण्याचे काम सुरू होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

252 कोटींचं ड्रग्ज कनेक्शन उघड; दाऊदचा भाचा, श्रद्धा कपूरच्या नावाचा समावेश, मनोरंजन विश्वात खळबळ|VIDEO

Maharashtra Live News Update: नाशिकच्या वनविहार कॉलनी परिसरात आणखी एक बिबट्या

Chanakya Niti: तुमच्या चांगुलपणाचा फायदा तर घेत नाहीत ना? चाणक्यांनी सांगितली माणसं ओळखण्याची ट्रिक

Maharashtra Politics: पुन्हा काका-पुतण्यात दुरावा! बिहार निवडणुकीच्या धामधुमीत भाजपनं खेळला डाव, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का

Bihar Election Result Live Updates : बिहारमधील विजयाचा अकोला भाजपकडून जल्लोष

SCROLL FOR NEXT