Amalner News Saam tv
महाराष्ट्र

Amalner News : नैराश्येतून सेवानिवृत्त शिक्षकाचे टोकाचे पाऊल; तापी नदीत घेतली उडी

Jalgaon News : राजेंद्र लोहारे यांनी पातोंडापासून जवळच असलेल्या सावखेडा तापी नदी पुलावर गेले. येथे त्यांनी आपली दुचाकी उभी करून नदीत उडी घेतली

Rajesh Sonwane

अमळनेर (जळगाव) : अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथील मूळ रहिवासी असलेलय सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकाने तापी नदी पुलावरून उडी घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आजारपणाच्या नैराश्येतून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. 

राजेंद्र रामदास लोहारे (वय ६१) असे मयत सेवानिवृत्त शिक्षकाचे नाव आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन भाऊ, बहिण असा परिवार आहे. (Amalner News) राजेंद्र लोहारे यांनी पातोंडापासून जवळच असलेल्या सावखेडा तापी नदी पुलावर गेले. येथे त्यांनी आपली दुचाकी उभी करून नदीत (Tapi River) उडी घेतली. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेण्यास सुरवात केली. मात्र रात्री त्यांचा शोध लागला नाही. 

यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा शोध घेतला असता मुंगसे- दापोरी गावाच्या नदीकाठी त्यांचा मृतदेह आढळून आला असल्याची माहिती मिळाली. या प्रकरणी अमळनेर पोलिस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे. सदर आत्महत्या त्यांनी दीर्घ आजाराच्या नैराश्यतुन त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT