Jalgaon Crime Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Crime : सेनेत भरतीचे आमिष दाखवून ९ तरुणांची फसवणूक; नाशिकच्या चौघांविरुद्ध गुन्हा

Jalgaon News : नाशिकमध्ये जानेवारी २०२२ मध्ये झालेल्या करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाला समाधान सुखदेव पाटील आला होता.

Rajesh Sonwane

अमळनेर (जळगाव) : प्रादेशिक सेनेत भरती करण्याचे आमिष दाखवून तरुणांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यात नाशिक येथील चौघांनी मिळून ९ तरुणांची फसवणूक केली आहे. हा प्रकार जानेवारी २०२२ ते एप्रिल २०२३ या दरम्यान घडला आहे. याबाबत एकाने दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलिसांत चौघांविरुद्ध साडेतीन लाखांत फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

नाशिकमध्ये (Nashik) जानेवारी २०२२ मध्ये झालेल्या करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाला समाधान सुखदेव पाटील आला होता. त्याला विलास धर्माजी पांडव, सुलोचना विलास पांडव, दीपक विलास पांडव व सचिन मधुकर केदारे (सर्व रा. साईराम रो-हाउस, कालिका पार्क, उंटवाडी, नाशिक) हे भेटले. यात विलास पांडव याने समाधान यास प्रादेशिक सेनेत भरती होण्याचा सल्ला दिला. त्यासाठी नाशिक येथे सहा महिन्यांचे निवासी प्रशिक्षण व मार्गदर्शन कोर्स करावा लागतो. खाण्यापिण्यासह सर्व खर्च चार लाख रुपये असल्याचे सांगितले. दरम्यान एकरकमी रक्कम दिल्यास ५० हजारांची सूट दिली जाईल, असे सांगत विश्वास संपादन केला. 

याबाबत समाधानने त्याच्या आईला विचारले असता तिने होकार दिला. (Amalner) याबाबत समाधानने मित्र ज्ञानेश्वर माळी, मंगेश पाटील, निखिल पाटील, जयेश जाधव, दीपक पाटील, प्रवीण पाटील, उमेश चव्हाण, मनोज पाटील यांना देखील सांगितले व त्यांनीही विलास पांडव व त्याचा भाचा सचिन केदारे याच्या बँक खात्यावर ऑनलाइन साडेतीन लाख रुपये टाकले. मात्र, अनेक महिने झाल्यानंतर देखील तरुणांना प्रशिक्षण मिळाले नाही. याबाबत विचारणा केल्यावर लवकरच प्रशिक्षण सुरू होईल; असे दरवेळी सांगण्यात आले. मात्र १४ एप्रिल २०२३ ला समाधान व त्याचा मित्र नाशिकला त्यांच्या घरी गेले. (Fraud) यावेळी विलासने तुम्हाला प्रशिक्षण देणार नाही, तुमचे पैसे परत करणार नाही. पैसे मागितले, तर जिवंत सोडणार नाही; अशी धमकी दिली. यामुळे समाधानने दिलेल्या फिर्यादीवरून चौघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : गोरेगावमध्ये कार व बेस्ट बसची समोरासमोर धडक, अपघातात चालक जखमी

Ayesha Khan : 'धुरंधर'च्या यशामुळे मोठ्या चित्रपटाची लॉटरी, अक्षय कुमारसोबत दिसणार 'शरारत' फेम आयशा खान

Gold Rate Today: सराफा बाजार उघडताच सोन्याची किंमत बदलली, वाचा २४k, २२k गोल्डचे ताजे दर

Railway Recruitment: परीक्षा नाही थेट रेल्वेत नोकरी; ५३४९ पदांसाठी भरती; अर्ज कुठे अन् कसा करावा?

Yavtmal Crime : दोस्त दोस्त ना रहा! संतापलेल्या मित्रानेच जिवाभावाच्या मित्राची केली हत्या, यवतमाळ हादरले

SCROLL FOR NEXT