Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News: झोक्‍यावर बसून करत होता अभ्‍यास; अचानक झाले होत्‍याचे नव्‍हते

झोक्‍यावर बसून करत होता अभ्‍यास; अचानक झाले होत्‍याचे नव्‍हते

साम टिव्ही ब्युरो

अमळनेर (जळगाव) : अमळनेर शहरातील मुंदडा नगरातील एका १४ वर्षीय मुलाचा झोका खेळतांना अचानक गळफास लागला. यात मुलाचा जागीच मृत्यु (Death) झाल्याची घटना रविवारी रात्री घडली. (Maharashtra News)

अमळनेरातील (Amalner) वेदांत संदीप पाटील असे मयत बालकाचे नाव आहे. रविवारी तो घरी वरच्या मजल्यावर झोक्यावर बसून अभ्यास करत होता. अभ्‍यास करताना झोक्याच्या दोरीचा गळफास लागल्याने त्याचा मृत्यु झाला. ही घटना आई– वडिलांना समजताच त्यांनी हंबरडा फोडला. सदर विद्यार्थी हा मुंदडा ग्लोबल स्कुलचा नववीचा विद्यार्थी (Student) आहे.

वेदांत याचे आई– वडिल दोन्ही शिक्षक आहेत. एस. आर. पाटील यांचा तो मुलगा आहे. काही महिन्यांपुर्वी कोण होणार करोडपती या कार्यक्रमात सहभागी झालेल्या जि. प. शाळेच्या शिक्षिका जयश्री पाटील यांचा मुलगा होता. त्याचा मृतदेह अमळनेर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला. रात्री उशिरा त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik News: भावली धबधबा मारहाण प्रकरण, पर्यटकांना मारहाण करतानाचा नवा VIDEO समोर

Monsoon Hair Care: पावसाळ्यात आठवड्यातून किती वेळा केस धुवावेत? पावसाळ्यात हीच चूक ठरू शकते केस गळतीचं कारण

Maharashtra News Live Update: जळगावात वेतन रखडल्यामुळे जळगाव महानगरपालिकेच्या कंत्राटी स्वच्छता कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

Urine Infection In Monsoon : पावसाळ्यात वारंवार होतेय युरिन इन्फेक्शन? मग 'या' चुका अजिबात करूच नका

Yavtmal : निकृष्ट सोयाबीन बियाण्यांवर मोठी कारवाई; १० प्रकरणांत गुन्हे, दोन कोटींच्या बियाण्यांच्या विक्रीवर बंद

SCROLL FOR NEXT