Accident News Saam tv
महाराष्ट्र

Accident: दुचाकीची बैलगाडीला धडक; तरुणाचा मृत्यू, एक जखमी

दुचाकीची बैलगाडीला धडक; तरुणाचा मृत्यू, एक जखमी

साम टिव्ही ब्युरो

तोंडापूर (जळगाव) : पोळ्याच्या सणानिमित्त मातीचे बैल विक्री करून घराकडे जात असताना कुंभारी बुद्रूक येथील दुचाकीस्वार तरुणाचा अपघातात (Accident) जागीच मृत्यू झाला. औरंगाबाद (Aurangabad) महामार्गावरील पहूर - वाकोद दरम्यान शनिवारी सकाळी बैलगाडीला धडक लागून हा अपघात घडला. (Jalgaon Jamner Accident News)

कुंभारी बुद्रूक (Jalgaon) येथील कुंभार व्यावसायिक विजय रमेश पांढरे (वय ३५) हा पोळ्यानिमित्त मातीचे बैल बनवून गावोगावी विक्री करीत असतो. विजय हा शनिवारी (ता. २०) सकाळी पहूर येथे मातीचे बैल विक्री करून दुचाकीने (एमएच ४५, क्यू ८१४३)आपला गावातील मित्र जगन भाऊराव गोपाळ याच्यासह घराकडे जात होता. पहूरपासून काही अंतरावर समोर शेतात जाणाऱ्या बैलगाडीला जोरदार धडक दिल्याने विजय पांढरे हा दुचाकीस्वार जागीच (Death) मृत्यू झाला तर पाठीमागे बसलेला जगन गोपाळ याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.

घरातील कर्ता पुरुष गेला

मृत विजय पांढरे याच्या पश्चात पत्नी, आई-वडील, तीन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. तो कुंभार व्यवसायातून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करत होता. घरातील कर्ता पुरुष गेल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. अपघाताची माहिती मिळताच माजी सरपंच सुरतसिंग जोशी, राजकुमार जोशी, विजय जोशी, पोलिस पाटील लक्ष्मण जोशी. डिगंबर जोशी यांच्यासह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत जखमीला पहूर येथे हलविले. दरम्यान, मृत विजयवर आज (ता. २१) सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस कर्मचारी रवींद्र देशमुख तपास करीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्र्याचे निधन; विधानभवनात पार्थिवाचे अंतिम दर्शन, मुख्यमंत्री, आमदारांनी वाहिली श्रद्धांजली

Railway Rules : प्रवाशांनो रेल्वेचं तिकीट रद्द करण्यापूर्वी वाचा 'हे' नवे नियम, नाहीतर मिळणार नाही रिफंड

Maharashtra News Live Update: सर्वधर्मसमभावाचा संदेश देत संत महमंदखान महाराजांची दिंडी धाराशिवमध्ये दाखल

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी! बंद झालेला ₹1500 चा हप्ता पुन्हा सुरू होणार, आदिती तटकरेंनी दिली अपडेट

Marathi Actress : 'वीण दोघांतली ही तुटेना' फेम अभिनेत्रीने खरेदी केली लग्जरी कार, नव्याकोऱ्या गाडीसोबत शेअर केला PHOTO

SCROLL FOR NEXT