Jalgaon Accident News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Accident News: पोलिसाने हात दाखवला अन्‌ झाला घात; ट्रक जागीच थांबल्‍याने ट्रकवर आदळून दुचाकीस्वार ठार

पोलिसाने हात दाखवला अन्‌ झाला घात; ट्रक जागीच थांबल्‍याने ट्रकवर आदळून दुचाकीस्वार ठार

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : पाळधी (ता. धरणगाव) गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावर उभ्या वाहतूक पोलिसाने ट्रकला हात (Jalgaon) देताच सुसाट आयशर ट्रक जागच्या जागी थांबला. ट्रकमागून येणारा दुचाकीस्वार त्या ट्रकवर आदळून (Accident) जागीच ठार झाला. संदीप गोरख देसले (वय ३५, रा. कुसुंबा, ता. जि. जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. (Tajya Batmya)

जळगाव जिल्‍हा रुग्णालयात परिचित व नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार संदीप देसले (रा. कुसुंबा, ता. जळगाव) येथे पत्नी व दोन मुलांसह वास्तव्याला होता. लक्झरीवर चालक म्हणून तो काम करीत होता. नेहमीप्रमाणे त्याने सुरत ते जळगाव बस घेऊन आला. कासोदा येथे प्रवाशांना सोडले. नंतर कासोदा येथून संदीप दुचाकीवरून जळगावकडे येण्यासाठी निघाला होता.

डोक्‍याला मार लागल्‍याने जागीच मृत्‍यू

राष्ट्रीय महामार्गावर सकाळी पाळधी गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक पोलिसांनी धरणगांकडून जळगावकडे येणारी आयशरला हात दिला. त्यामुळे आयशर ट्रक जागीच थांबला. तेवढ्यात संदीप देसले दुचाकीने येत असताना मागून जोरदार धडक दिली. यात संदीपच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेबाबत जिल्हापेठ (Police) पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. मृताच्या पश्चात आई अरुणाबाई, वडील गोरख देसले, भाऊ दीपक, पत्नी सोनाली आणि ज्ञानेश्वरी व दर्पण हे दोन मुले असा परिवार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT