Jalgaon Accident News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Accident News: पती– पत्‍नीचा ट्रकच्या धडकेत मृत्यू; तीन वर्षीय चिमुकला बचावला

पती– पत्‍नीचा ट्रकच्या धडकेत मृत्यू; तीन वर्षीय चिमुकला बचावला

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : शालकाला मुलगा झाला म्हणून त्यांची भेट घेवून घराकडे परतणाऱ्या दाम्पत्यावर क्रुर काळाने झडप घातली. (Jalgaon News) अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील पती- पत्नी ठार झाल्याची (Accident News) घटना शनिवारी (२४ जून) नशिराबादजवळ (ता. जळगाव) महामार्गावर घडली. या अपघातात तीनवर्षीय बाळ मात्र सुखरुप बचावले आहे. (Maharashtra News)

सामरोद (ता. जामनेर) येथील शेनफडू बाबुराव कोळी (वय ३५) व त्यांची पत्नी भारती कोळी (वय ३२) असे मयत दांपत्याचे नाव आहे. तर चिमुरडा रुद्र (वय ३) सुखरुप बचावला आहे. कोळी दाम्पत्य मुलगा रुद्र याच्यासह सामरोद येथे वास्तव्यास आहे. शेती काम करून ते कुटूंबाचा उदरनिर्वाह करत होते. शेनफडू कोळी यांच्या असोदा येथील शालकाला मुलगा झाल्याने त्याला पाहण्यासाठी ते पत्नी व मुलासह शुक्रवारी (२३ जून) आसोदा येथे आले होते. रात्रभर मुक्काम करून शनिवारी सकाळी ते दुचाकीने नशिराबाद मार्गे सामरोदला परत जात होते.

पत्‍नीचा जागीच मृत्‍यू

नशिराबाद येथे महाजन हॉटेलजवळ महामार्गावर त्यांच्या दुचाकीला अज्ञात आयशर वाहनाने धडक दिल्याने ते जागीच कोसळले. या अपघातात भारती कोळी यांचा जागीच मृत्यू झाला. तर, शेनफडू कोळी व त्यांचा मुलगा रुद्र याला नशिराबाद पोलीस व नागरिकांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी आणले. तेथे उपचार सुरू असताना शेनफडू यांचा मृत्यू झाला. रुद्र याला किरकोळ मार लागला असून, तो सुखरूप आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते.

तीन वर्षीय रुद्र अनाथ

अपघास्थळावर घडलेल्या अकल्पीत व अनुचित प्रकारानंतर बाळ रुद्र गर्दीकडे एकटक बघत रडत होता. बाळाचे छत्रच हरपल्याने अनेकांना रडू कोसळले. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर मयत कोळी परिवाराच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी केली होती. काही वेळापूर्वी आपल्या घरी भेट घेऊन गेलेली बहीण आणि मेहुण्यांच्या मृत्यूची बातमी मिळताच आसोदा येथे राहणाऱ्या शालकालाही जबर मानसीक धक्का बसला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune To Beed Travel: पुण्याहून बीडपर्यंतचा प्रवास कसा करावा? जाणून घ्या मार्ग, वेळ आणि प्रवासाच्या सोयी

Ashadhi Ekadashi 2025 : आषाढी एकादशी निमित्त खास माहिती, चंदनाचा टीका लावल्याचे फायदे

Ex Boyfriend zodiac sign: एक्स बॉयफ्रेंड तुमच्या आयुष्यात पुन्हा डोकावतोय? राशीनुसार जाणून घ्या त्याचा प्लान

Sushil Kedia: ठाकरेंची माफी मागून केडियानं पुन्हा पलटी मारली; म्हणाला 'काय बोललो याचा पश्चाताप नाही'

CHYD : 'चला हवा येऊ द्या' महाराष्ट्राला खळखळून हसवायला सज्ज; कॉमेडीचं गँगवॉर 'या' दिवसापासून सुरू, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT