Accident News Saam tv
महाराष्ट्र

Accident News: मुलीची भेट राहिली; ट्रकच्‍या धडकेत पित्याचा जागीच मृत्यू

मुलीची भेट राहिली; ट्रकच्‍या धडकेत पित्याचा जागीच मृत्यू

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : लहान मुलीला भेटण्यासाठी मोठ्या मुलीसोबत निघालेल्या दुचाकीस्वार पित्याला भरधाव ट्रकने जळगाव (Jalgaon) तालुक्यातील रामदेववाडी गावाजवळ चिरडल्याची दुदैवी (Accident News) घटना शनिवारी (ता. ३१) दुपारी घडली. (Live Marathi News)

एमआयडीसी पोलिस (Police) ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. राजू दीपक कोळी (वय ४५, रा. चारठाणा, ता. मुक्ताईनगर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, चारठाणा (ता. मुक्ताईनगर) येथे राजू कोळी कुटुंबासह वास्तव्याला होते. शेतीकाम करून उदरनिर्वाह करत होते. भडगाव येथील लहान मुलीला भेटण्यासाठी राजू कोळी दुचाकीने जळगावहून निघाले.

ट्रकची समोरून धडक

दुपारी साडेबाराच्या सुमारास शिरसोली गावापुढील रामदेववाडी गावाजवळच समोरून भरधाव येणाऱ्या वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात राजू कोळी यांच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर मागे बसलेली मोठी मुलगी सोनी कोळी ही गंभीर जखमी झाली. अपघातानंतर घटनास्थळी ग्रामस्थांची गर्दी झाली होती. एमआयडीसी पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी स्वप्नील पाटील, हेमंत पाटील यांनी घटनास्थळी दाखल झाले. जखमीस खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : भयंकर! ट्रेनमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार; ट्रॅकवर फेकल्यानंतर पीडितेच्या पायावरून गेली एक्स्प्रेस

Mira Bhayandar protest : मिरा-भाईंदरमध्ये शिंदेंच्या मंत्र्याविरोधात जनआक्रोश; आंदोलकांनी प्रताप सरनाईकांना मोर्चातून हुसकावलं, VIDEO

Pune Crime : स्पा सेंटरच्या नावाखाली गोरख धंदा, पोलिसांनी छापा टाकताच सर्व सैरभैर; पुण्यात खळबळ

MNS : मनसेची पुन्हा टोलधाड! अख्खा टोलनाका फोडला | VIDEO

No Overtime : ओव्हरटाईम टाळा, आरोग्य सांभाळा; आयटी कंपनीची कर्मचाऱ्यांसाठी अलर्ट सिस्टिम

SCROLL FOR NEXT