Jalgaon Accident News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Accident News : सुसाट कारचे टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटून कार उलटली; महामार्गावरील थरार

Jalgaon सुसाट कारचे टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटून कार उलटली; महामार्गावरील थरार

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : नशिराबादवळील उड्डाणपुलावर भुसावळकडून जळगावकडे (Jalgaon) सुसाट जाणाऱ्या कारचे टायर फुटले. यामुळे कार उलटली. या अपघातात (Accident) कारमधील चौघे सुदैवाने बचावले आहेत. (Tajya Batmya)

जळगाव जिल्हा केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष सुनील भंगाळे शनिवारी (२२ जुलै) दुपारी भुसावळकडून जळगावकडे येत होते. या दरम्यान नशिराबादजवळील उड्डाणपुलावर कारचे टायर अचानक फुटल्याने चालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटले व कार उलटली. इतर वाहन धारकांनी कारमधून एका मागून एकाला बाहेर काढून तातडीने उपचारासाठी रवाना केले. 

चौघे किरकोळ जखमी 

अपघातग्रस्त कारमध्ये जिल्‍हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सुनील भंगाळे यांच्यासोबत सचिव अनिल झंवर, इरफान सालार, दिनेश मालू होते. अपघातात किरकोळ दुखापत वगळता कोणासही मोठी इजा झालेली नाही. अपघातग्रस्त कार अनिल झंवर यांची असल्याची माहिती समोर आली आहे. रात्री उशिरापर्यंत नशिराबाद पोलिसांत या प्रकरणी कुठलीही नोंद झाली नव्हती. मात्र, कार ताब्यात घेतल्याची माहिती नशिराबाद पोलिसांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बुलढाण्यात दोन गटात तुफान हाणामारी; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यासह शिवसेनेच्या नगरसेवकाचा मृत्यू

रशियात नवा व्हायरस लॉकडाऊनची भीती, लॅबमधून बाहेर पडला कोरोनाचा भाऊ?

भाजपनं भाकरी फिरवली! युवा मोर्चाची टीम जाहीर; 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी, कोण-कोणाला मिळाली संधी, वाचा जिल्हानिहाय यादी

कट्टर विरोधक झाले मित्र! विखे-थोरात यांची युती; राजकारण ढवळून निघालं

45 Days Eating One Banana Benefits: सलग ४५ दिवस रोज १ केळं खाल्लं तर काय बदल होतात? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT