नियमीत पाणी पुरवठ्याच्या मागणीसाठी तलावात उड्या घेत जलसमाधी आंदोलन... दीपक क्षीरसागर
महाराष्ट्र

नियमीत पाणी पुरवठ्याच्या मागणीसाठी तलावात उड्या घेत जलसमाधी आंदोलन...

अहमदपूर शहरातील कायमस्वरुपी पाणी पुरवठा योजना दोन वर्षात पुर्ण होणे अपेक्षित असताना 4 वर्षे होऊनही पाणी पुरवठा योजनेचे काम पुर्ण झालेले नाही.

दीपक क्षीरसागर, साम टिव्ही, लातूर

लातूर: अहमदपुर शहरात सध्या होत असलेल्या पाणी पुरवठ्यात बदल करून दोन दिवसाला एक वेळा पाणी पुरवठा करावा या मुख्य मागणीसह इतर मागण्यांसाठी तलावात साजिदभाई मित्र-मंडळाच्या वतीने जलसमाधी आंदोलन करण्यात आले. अहमदपूर शहरातील कायमस्वरुपी पाणी पुरवठा योजना दोन वर्षात पुर्ण होणे अपेक्षित असताना 4 वर्षे होऊनही पाणी पुरवठा योजनेचे काम पुर्ण झालेले नाही. (Jalasamadhi agitation jumping into the lake to demand regular water supply)

हे देखील पहा -

शहरामध्ये जलवाहिनीसाठी खोदलेले रस्ते दुरूस्ती करावे, नळ जोडणी मोफत देण्याची तरतुद असुन सुध्दा दोन ते अडीच हजार रुपये प्रत्येकी कनेक्शनला घेतले जात आहेत. जुन्या गावामध्ये पाईपलाईन टाकलेली नाही. या मागण्यांसाठी वाकी नदीच्या साठवण तलावात करण्यात आलेल्या  जलसमाधी अंदोलनात मंडळाचे अध्यक्ष साजिद सय्यद यांच्यासह इतर वीस ते पंचवीस जणांनी पुलावरून साठवण तलावात उडी घेतली. दरम्यान मागण्या मान्य करण्याचे आश्वसन प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्याने आंदोलक पाण्याबाहेर आले.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

डायबिटिस पेशंटसाठी 10 नैसर्गिक उपाय, हे पदार्थ खा ब्लड शुगर राहील कंट्रोलमध्ये

Accident News : देवीच्या मंदिराबाहेर भयंकर घडलं! भरधाव कारची भाविकांना धडक; ३ जणांचा जागीच मृत्यू

White vs Yellow Ghee : पांढरे की पिवळे तूप? आरोग्यासाठी जास्त फायदेशीर काय? रोज खाण्यापूर्वी जाणून घ्या

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

Vastu Tips: महिन्याच्या शेवटी खिशात पैसा राहात नाही? आजच करा हे ५ सोपे उपाय; कधीही भासणार नाही पैशांची चणचण

SCROLL FOR NEXT