Nashik News  Saam TV
महाराष्ट्र

Nashik Farmers News : इस्राइल-हमास युद्धाचा नाशिकमधील शेतकऱ्यांना फटका, काय आहे कारण?

Nashik Grapes Farmers News : आधीच दुष्काळ, अवकाळी पाठोपाठ इस्राइल-हमास युद्धामुळे शेतकऱ्यांची अडचणी वाढताना दिसत आहे. इस्राइल-हमास युद्धाचा परिणाम द्राक्ष निर्यातीवर होताना दिसत आहे.

अभिजीत सोनावणे

Nashik News :

इस्राइल - हमास युद्धाची झळ आता महाराष्ट्रापर्यंत पोहोचली आहे. हे युद्ध अद्याप थांबण्याची चिन्हे नाहीत. गेल्या काही महिन्यांपासून हा संघर्ष पेटलेलाच आहे. अख्ख्या जगाची यात काहीअंशी होरपळ सुरू आहे. महाराष्ट्रातील नाशिकच्या शेतकऱ्यांनाही या युद्धाचा तडाखा बसला आहे.

सुएझ कालव्यामुळे युरोप व आशिया या दोन खंडांदरम्यान जलद सागरी वाहतूक शक्य झाली आहे. मात्र इस्राइल-हमास युद्धाचा परिणाम सागरी वाहतुकीवर झाला आहे. (Nashik News)

आधीच दुष्काळ, अवकाळी पाठोपाठ इस्राइल-हमास युद्धामुळे शेतकऱ्यांची अडचणी वाढताना दिसत आहे. इस्राइल-हमास युद्धाचा परिणाम द्राक्ष निर्यातीवर होताना दिसत आहे. इस्राइल-हमास युद्धामुळे द्राक्ष निर्यातीला ब्रेक लागला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

लाल समुद्रामधून सुएझ कालव्याला जोडण्यासाठी सर्वात सोयीस्कर असलेल्या गाझापट्टी मार्गावर अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे जहाज वाहतूक बंद आहे. अतिरेक्यांच्या वाढत्या हल्ल्यामुळे सुएझ कालवा आणि लाल समुद्रातील वाहतूक बंद झाल्याने द्राक्ष निर्यातीची जहाजं कंपन्यांनी थांबवली आहेत.

नवीन केप ऑफ गुड होपमार्गे द्राक्ष निर्यातीसाठी ३४ ते ३८ दिवस लागणार आहेत. तसेच वाहतूक खर्चात मोठी वाढ होणार असल्याने तूर्तास जहाज कंपन्यांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे. परिणामी द्राक्ष निर्यात थांबल्याने द्राक्ष खराब होऊन मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: माऊलीच्या पालखीचं पुण्याहून सासवडकडे प्रस्थान

Saturday Horoscope: आर्थिक लाभाच्या संधी मिळतील; 5 राशींच्या व्यक्तींना पैसा जपून वापरण्याचा सल्ला; वाचा शनिवारचे राशीभविष्य

बोगस बियाण्यानंतर बोगस खतांचा साठा जप्त; राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक सुरूच

पुरातून हत्तीने वाचवलं वाघाला? पाठीवर बसवून हत्तीने केली सुटका?

Bihar Politics: राज्यातील भाजपचं सरकार कोसळणार? नितीश कुमारांनी मुख्यमंत्र्यांना फटकारलं, बड्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

SCROLL FOR NEXT