BJP 
महाराष्ट्र

'तुम्हांला सहज जाऊ देणार नाही'; भाजप नेत्यास धमकीचा संदेश

विजय पाटील

सांगली : माेदी, शहाच काय बीजीपे आमचं काही करु शकणार नाही. शेवटी तुम्ही एक गद्दार आहात, राजारामबापूंच्या पाठीत खंजीर खपूसलाय. तुम्हांला असं सहज साेपे जाऊ देणार नाही. वेट अॅन्ड वाॅच असा संदेश एकाने इस्लामपुरचे islampur नगराध्यक्ष आणि भाजपचे नेते निशिकांत पाटील nishikant patil यांना पाठवला आहे. जूलै महिन्यांत पाठविण्यात आलेला हा संदेश काेणी पाठवला याचा तपास अद्याप लागला नसल्याने भाजपचे BJP कार्यक्रर्ते आक्रमक झाले आहेत.

नगराध्यक्ष पाटील यांना परदेशातील क्रमांकावरुन व्हाट्सअप संदेश पाठवून धमकी देण्यात आल्याचे भाजप कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. मोदी, शहा, चंद्रकांत पाटील आणि जयंत पाटील यांच्या नावाचा उल्लेख या संदेशात आहे. या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्यासाठी नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी इस्लामपुर पोलिसात तक्रार केली आहे.

धमकी दिलेल्या संदेशात चंद्रकांत पाटील यांच्या मागे लपून जयंत पाटील यांच्यावर वार करू नका. माेदी, शहाच काय बीजीपे आमचं काही करु शकणार नाही. शेवटी तुम्ही एक गद्दार आहात, राजारामबापूंच्या पाठीत खंजीर खपूसलाय. तुम्हांला असं सहज साेपे जाऊ देणार नाही. वेट अॅन्ड वाॅच असंही संदेशाच्या अखेर म्हटलं आहे.

दरम्यान वाळवा तालुका हा सुसंस्कृत राजकारण्यांचा तालुका आहे. या तालुक्यातील नगराध्यक्षांना धमकीचा संदेश येणे आणि सुसंकृत राजकारणाला वेगळ्या दिशेने बघितले जाणे ही बाब चांगली नाही असे भाजपचे तालुका अध्यक्ष धैर्यशिल माेरे यांनी नमूद केले.

ते म्हणाले इस्लामपुरचे नगराध्यक्ष भाजपचे नेते निशिकांत पाटील यांना धमकीचा संदेश पाठविला गेला. त्यांना वारंवार त्रास दिला जात आहे. गेले दीड महिना झालं पाेलिसांना हा संदेश कुणी पाठवला याचा शाेध घेता आलेला नाही. पाेलिसांनी तातडीने तपास पुर्ण करावा अन्यथा भाजप आंदाेलन छेडू तसेच न्यायालयात धाव घेऊ असेही माेरे यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL CSK vs DC: अखेर चेन्नई सुपर किंग्सनं उघडलं विजयाचं खातं; सॅमसन-ओव्हरटन ठरले हिरो

Asha Bhosle Health Update: आशा भोसले यांच्या नातनं दिली आजीच्या प्रकृतीची अपडेट; काय म्हणाली जनाई?

Sahyadri Express Loot: सिग्नलमध्ये बिघाड करुन सह्याद्री एक्सप्रेसवर दरोडा; प्रवाशांचे मोबाईल, सोने लुटले

Sanju Samson Century: संजू सॅमसनचा जबरा तडाखा, फक्त ५२ चेंडूंत ठोकलं शतक; अनेक रेकॉर्ड उद्ध्वस्त, CSK चा धावांचा डोंगर

मोदी सरकारचा मोठा धक्का! डिझेलवरील निर्यात शुल्क वाढवला

SCROLL FOR NEXT