Devendra Fadnavis And Rashmi Shukla  saam tv
महाराष्ट्र

रश्मी शुक्ला महाराष्ट्र पोलीस दलात परतणार ? उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण

फोन टॅपिंगप्रकरणी पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला अडचणीत असतानाच पुन्हा चर्चेत आल्या आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुमित सावंत

मुंंबई : फोन टॅपिंगप्रकरणी पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) अडचणीत असतानाच आता राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. रश्मी शुक्ला आणि राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात खलबतं झाली आहेत. दरम्यान(Devendra Fadnavis) फडणवीस यांच्या भेटीनंतर रश्मी शुक्ला पुन्हा चर्चेत आल्या आहेत. त्यामुळे शुक्ला पुन्हा महाराष्ट्र पोलीस दलात परतणार, अशी शक्यता निर्माण झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सध्या रश्मी शुक्ला केंद्रीय प्रतिनियुक्तीवर सीआरपीएफमध्ये अतिरिक्त महासंचालक आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात दाखल झालेल्या फोनटॅपिंग प्रकरणात शुक्ला आरोपी आहेत. पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी भ्रष्टाचार होतो, असा अहवाल शुक्ला यांनी तयार केला होता.

हा अहवाल लिक झाल्याने रश्मी शुक्ला यांच्यावर आरोप करण्यात आले. फडणवीस सरकारच्या काळात रश्मी शुक्ला राज्य गुप्तवार्ता विभागाच्या प्रमुख होत्या. आरोप झाल्यानंतर शुक्ला केंद्रीय प्रतिनियुक्तीवर सीआरपीएफमध्ये गेल्या. आता शिंदे- फडणवीस सरकार आल्यानंतर शुक्ला पुन्हा महाराष्ट्र पोलीस दलात वरिष्ठ पदावर येण्याची शक्यता आहे.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Bhasha Vijay: मनसेचा दणका! राज ठाकरे माझे हिरो आहेत – सुशील केडियाचा माफीनामा|VIDEO

Monsoon Skin Care: पावसाळ्यात चेहऱ्यावरील पिंपल्सपासून सुटका हवीय? 'या' घरगुती उपायांनी मिळवा चमक

Thackeray Family Reunites : अभूतपूर्व ऐतिहासिक क्षण! राज- उद्धव ठाकरे यांचं संपूर्ण कुटुंब एकत्र | पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण आणि उद्घाटन सोहळा

Sara Ali Khan: पतौडीच्या राजकुमारीचे क्यूट बार्बी डॉल लूक पाहिलेत का?

SCROLL FOR NEXT