IPL Match Betting Saam tv
महाराष्ट्र

IPL Match Betting : आयपीएल क्रिकेटवर सट्टा; जळगाव, यवतमाळमध्ये कारवाई, सात जणांना घेतले ताब्यात

Jalgaon Yavatmal News : इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल टी- २० क्रिकेट मॅच सुरु आहे. कोणता संघ जिंकेल, कोण जास्त रन काढणार, कोण किती विकेट घेणार तसेच मॅचच्या प्रत्येक बॉलवर सट्टा लावला जात आहे

Rajesh Sonwane

संजय महाजन/ संजय राठोड 

जळगाव/ यवतमाळ : आयपीएल क्रिकेट मॅचचा थरार सुरु असून यातील प्रत्येक मॅचवर जोरदार सट्टा लावला जात आहे. अशाच प्रकारे जळगाव जिल्ह्यातील रावेर येथे तसेच यवतमाळ शहरात ऑनलाईन सट्टा लावणाऱ्यांविरोधात पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. यात रावेरमधून तीन जण तर यवतमाळमध्ये झालेल्या कारवाई चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. 

इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल टी- २० क्रिकेट मॅच सुरु आहे. स्पर्धा रंगतदार पद्धतीवर पोहचली असून कोणता संघ जिंकेल, कोण जास्त रन काढणार, कोण किती विकेट घेणार तसेच मॅचच्या प्रत्येक बॉलवर सट्टा लावला जात आहे. यातच आयपीएलसाठी सुपर संडेच्या दिवशी दोन मॅचेस झाल्या. याच मॅच दरम्यान सट्टा लावणाऱ्यांविरोधात पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. 

रावेरमध्ये दोन ठिकाणी छापेमारी   
जळगावच्या रावेर शहरात दोन ठिकाणी आयपीएल क्रिकेट स्पर्धेवर सट्टा लावण्यात येत असल्याचे समोर आले आहे. शहरात या सामन्यांवर पैसे लावून सट्टा खेळला जात असल्याची माहिती पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांना मिळाली. त्यानुसार पथकाने शहरातील रामचंद्रनगर भागात एका घराच्या आडोशाला दोन जण स्लीपबुकवर काही तरी लिहिताना आढळून आले. पथकाने येथे छापा टाकला मात्र काहीजण गल्लीबोळाचा फायदा घेऊन पळून गेले. तर तीन जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून जुगाराचे बुक व मोबाईल असा एकूण एक लाख एक हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 

यवतमाळमध्ये चौघांना अटक
यवतमाळ
: यवतमाळच्या घाटंजीतील कान्होबा टेकडी परिसरात खुल्या जागेत आयपीएल क्रिकेट मॅचवर सट्टा सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी छापा टाकून चौघांना अटक केली. त्यांच्याकडून एक लाख ७१ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून हैदराबाद विरुद्ध पंजाब या क्रिकेट मॅचवर फोनच्या साह्याने लोकांकडून पैसे घेऊन क्रिकेट सट्टा लावणाऱ्यांना पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: धाराशिवात १७ मुलींना झाली विषबाधा

The Hunt: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित 'द हंट' ही मालिका तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता?

Apoorva Nemalekar : “प्रवास सोप्पा नव्हता...'' मालिकेला निरोप देताना अपूर्वाची भावूक पोस्ट व्हायरल

Rupali Bhosle: 'रूप तेरा मस्ताना' रूपाली भोसलेचे फोटो पाहून तुम्हीही हेच म्हणाल...

Politics: 'केम छो शिंदेसाहेब..' जय गुजरातच्या घोषणेवर एकनाथ शिंदेंवर टीकेचा पाऊस, राष्ट्रावादी काँग्रेसच्या आमदारानं डिवचलं

SCROLL FOR NEXT