Intervention petition on Maharashtra-Karnataka border dispute saam tv
महाराष्ट्र

मोठी बातमी! महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल

Intervention petition on Maharashtra-Karnataka border dispute: बेळगांव, कारवार, धारदार, निपाणी सह ८१४ गाव जे कर्नाटक राज्यात आहेत, ते महाराष्ट्रामध्ये विलीन होण्यासाठी १९५६ पासून प्रतिक्षेत आहेत.

Shivaji Kale

Maharashtra-Karnataka Border Dispute: महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद चिघळला असताना एक मोठी बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आली आहे. सतीष विडोळकर आणि छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य मिशन यांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात ही हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आली आहे. सतीष विडोळकर यांच्या वतीने महाराष्ट्रातील १५० गावांनी इतर राज्यात जाण्याच्या भूमिकेला विरोध करणारी याचिका दाखल केली आहे. (Maharashtra-Karnataka Border Dispute)

काय आहे याचिका?

मिळालेल्या माहितीनुसार, सतीष विडोळकर यांच्या वतीने महाराष्ट्रातील १५० गावांनी इतर राज्यात जाण्याच्या भूमिकेला विरोध करणारी याचिका (Petition) दाखल केली आहे.  या १५० गावांपैकी मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील २५ गाव हे गाव तेलंगणामध्ये जाऊ इच्छितात. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यांतील ४० गावं कर्नाटकमध्ये जाऊ इच्छितात. तसेच बुलढाणा जिल्ह्यातील ४ गावांनी मध्यप्रदेशमध्ये जाण्याची भूमिका घेतली आहे. (Latest Marathi News)

चंद्रपुर जिल्ह्याच्या सीमाभागातील १४ गावं तेलंगणा राज्यात जाऊ इच्छितात. या गावांचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने १९९७ ला महाराष्ट्राच्या बाजूने दिला आहे. नाशिकमधील काही गावांनी गुजरातमध्ये जाण्याची भूमिका घेतली आहे, तर सोलापूर जिल्ह्यातील काही गावं कर्नाटक राज्यात जाऊ इच्छितात. या गावांनी दुसऱ्या राज्यात जाऊ नये म्हणून महाराष्ट्र शासनाने त्यांना सुविधा द्याव्यात यासाठी सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आली आहे.

त्याचबरोबर बेळगांव, कारवार, धारदार, निपाणी सह ८१४ गाव जे कर्नाटक राज्यात आहेत, ते महाराष्ट्रामध्ये विलीन होण्यासाठी १९५६ पासून प्रतिक्षेत आहेत. या गावांना महाराष्ट्रात विलीन करून घ्यावं. महाराष्ट्र राज्य विरूद्ध भारत सरकार आणि इतर हा वाद २००४ पासून प्रलंबित आहे. या संदर्भात ॲड राजसाहेब पाटील, ॲड विजय खामकर, ॲड तुषार भेलकर, ॲड सुप्रिया वानखेडे याचिकाकर्त्यांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडणार आहे..

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Wash Risks: सलोनमध्ये केस धुतल्याने ब्रेन स्ट्रोकचा धोका वाढतो का? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

Maharashtra Live News Update: वेण्णालेक येथे अडकलेली बोट बाहेर काढण्यात आली, पर्यटकांनी सोडला सुटकेचा निश्वास

Shocking: नवऱ्याचं दुसऱ्या महिलेसोबत लफडं; बायकोने घडवली कायमची अद्दल, गुप्तांगावर फेकलं उकळतं पाणी अन् अ‍ॅसिड

Thamma Collection : 'थामा'ची बंपर ओपनिंग; पहिल्याच दिवशी 'सैयारा'ला पछाडलं, रश्मिका-आयुष्मानची जोडी सुपरहिट

Prajakta Mali Family Photo: अभिनेत्री प्राजक्ता माळीने कुटुंबासोबत साजरी केली दिवाळी, लक्ष्मीपूजनाचे खास फोटो शेअर

SCROLL FOR NEXT