Sharad Pawar saam tv
महाराष्ट्र

Sharad Pawar : 'तुम्ही काय मला म्हातारा समजता...';शरद पवार असं का म्हणाले?

पवारांच्या अशा बोलण्याने उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये एकच हशा पिकतो.

Ruchika Jadhav

Sharad Pawar MPSC Student : एमपीएससी विद्यार्थ्यांचा प्रश्न सध्या महाराष्ट्रात ऐरणीवर आलाय. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला राजकीय वळण आल्याचंही बोललं जातयं. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुण्यात विद्यार्थ्यांची भेट देखील घेतली होती. दरम्यान आज पुन्हा मुंबईत विद्यार्थ्यांसोबत संवाद देखील साधला,यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेताना एका विद्यार्थ्याच्या प्रश्नावर पवारांनी भन्नाट उत्तर दिलंय. (Latest Sharad Pawar MPSC Student News)

शरद पवार यांनी पुण्यात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असताना तेथे देखील हजेरी लावत विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. तेव्हा ते पुण्यात येत आहेत यावर विद्यार्थ्यांना विश्वासचं बसेना.

त्यावर पवारांनी उत्तर देत म्हटलं की,ते सर्व ठिक आहे, " पण माझी एक तक्रार आहे तुमच्याकडे. तुम्ही काय मला म्हातारा समजता?" असं पवार म्हणतात. त्यांच्या अशा बोलण्याने उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये एकच हशा पिकतो.

सध्या राजकारणात सर्वाधिक पावसाळे पाहिलेले शरद पवार हे एकमेव आहेत. विद्यार्थ्यांशी बोलताना यावेळी त्यांनी फक्त एमपीएससी का इतर पर्याय का नाही निवडत तुम्ही? असा प्रश्न विचारला. तसेच व्यवसायीक क्षेत्राकडेही विद्यार्थ्यांनी वळले पाहिजे असं मार्गदर्शन देखील केलं. मेडिकल झाल्यावर MPSC कडे का जात, हे टाळले पाहिजे. प्रॅक्टिस करावीशी वाटत नाही का? असा पश्नही शरद पवारांनी विद्यार्थ्यांना विचारला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : रखडेलेली सर्व कामे पूर्ण होणार, कामगारांची होणार चांदीच चांदी; वाचा आजचे राशीभविष्य

Best Bus Strike: अखेर तोडगा निघालाच! बेस्टचा संप मागे, कर्मचाऱ्यांना मिळणार २००० रुपये मासिक हंगामी वाढ

ओमराजे निंबाळकरांचं अखेर ठरलं! ठाकरेंच्या मनधरणीच्या प्रयत्नांना अपयश

मुलीला वाचवण्यासाठी बाप बिबट्याशी भिडला; मृत्यूच्या जबड्यातून चिमुकलीची सुटका

अमिताभ बच्चन यांची लेक संजय राऊतांची फॅन; खुद्द जया बच्चन यांचा खुलासा

SCROLL FOR NEXT