Sindhudurg Accident: जानवलीजवळ इनोव्हा कार आणि लक्झरीमध्ये भीषण अपघात, ९ जखमी विनायक वंजारे
महाराष्ट्र

Sindhudurg Accident: जानवलीजवळ इनोव्हा कार आणि लक्झरीमध्ये भीषण अपघात, ९ जखमी

कोल्हापूरहून मालवणच्या दिशेने मुंबई- गोवा महामार्गावरून जाणाऱ्या इनोव्हा कारने जानवली येथे एका गॅरेज जवळ उभ्या असलेल्या लक्झरीला जोरदार धडक दिली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विनायक वंजारे

सिंधुदुर्ग: कोल्हापूरहून (Kolhapur) मालवणच्या दिशेने मुंबई(Mumbai)- गोवा (Goa) महामार्गावरून जाणाऱ्या इनोव्हा कारने (car) जानवली येथे एका गॅरेज जवळ उभ्या असलेल्या लक्झरीला जोरदार धडक दिली आहे. यामुळे झालेल्या अपघातात (accident) इनोव्हा कारमधील ९ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. हा अपघात सकाळी ९.३० वाजेच्या दरम्यान घडला आहे. (Innova car and luxury Terrible accident near Janwali)

हे देखील पहा-

अपघाताची माहिती समजताच स्थानिकांनी अपघातस्थळी धाव घेत जखमींना तत्काळ कणकवली (Kankavli) उपजिल्हा रुग्णालयात (hospital) उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे. याविषयी मिळालेल्या अधिक माहितीनुसार की, इनोव्हा कार मधील प्रवासी हे कोल्हापूर (Kolhapur) वरून मालवणच्या दिशेने जात होते.

कणकवली नजीक जानवली येथे मारुती सुजूकी शोरूम दरम्यान इनोव्हा कार चालकाचा गाडीवर असलेला ताबा सुटून एका गँरेज समोर उभ्या असलेल्या लक्झरीला जोरदार धडक दिली आहे. यामध्ये इनोवा कारचा दर्शनी भाग मागच्या सीट पर्यंत येऊन पूर्णता चक्काचूर झाला आहे. या अपघातानंतर कणकवली पोलिस (Police) घटनास्थळी दाखल झाले असून पंचनाम्याचे काम सुरू आहे. या प्रकरणाचा अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पेट्रोल-डिझेल दरवाढीनंतर आणखी एक धक्का; विमान तिकीट दर गगनाला भिडला, VIDEO

17 कोटींची चांदी घेऊन जाणारी व्हॅन पलटी; मुंबई-अहमदाबाद महामार्गावर खळबळ|VIDEO

पुण्यातील रूग्णालयात टायमर बॉम्ब का ठेवला? आरोपीनं ATS ला शब्द ना शब्द सांगितलं, कारण ऐकूण पोलीस हादरले

Monsoon 2026: गुड न्यूज! २४ तासांत मान्सून धडकणार, पुढील ४ दिवस महाराष्ट्रात तुफान पाऊस

आदेश बांदेकरांच्या सुनेला पाहिलात का? दिसतेय जणू इंद्राची अप्सरा

SCROLL FOR NEXT