किर्तनकार इंदोरीकर महाराजांच्या अडचणीत वाढ Saam Tv
महाराष्ट्र

किर्तनकार इंदोरीकर महाराजांच्या अडचणीत वाढ

प्रसिद्ध किर्तनकार इंदोरीकर महाराज यांना वादग्रस्त वक्तव्य प्रकरणात संगमनेर सत्र न्यायालयाने त्यांना थोडा दिलासा दिला होता.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संगमनेर : प्रसिद्ध किर्तनकार इंदोरीकर महाराज Indorikar Maharaj यांना वादग्रस्त वक्तव्य प्रकरणात संगमनेर Sangamner सत्र न्यायालयाने court त्यांना थोडा दिलासा दिला होता. पण, आता उच्च न्यायालयाने सरकारी Government पक्षाकडून याचिका दाखल झाल्याने इंदोरीकर महाराजांच्या अडचणीत वाढ झाली आहे. महाराष्ट्रामधील Maharashtra कीर्तन क्षेत्रात ख्यातनाम असलेले इंदोरीकर महाराज हे वादग्रस्त वक्तव्यामुळे अडचणीत आले.

पुत्र प्राप्ती विषयी किर्तनात बोललेल्या वक्तव्याने अंधश्रद्धा निर्मूलन समितीने संगमनेर मधील दिवाणी न्यायालयात गुन्हा दाखल झाला होता. या विरोधात इंदोरीकर महाराजांनी संगमनेर या ठिकाणी जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतले होते. मागील काही महिने सरकारपक्ष आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीने इंदोरीकर महाराज कसे दोषी आहेत, ही बाजू मांडण्यात आली होती.

हे देखील पहा-

मात्र, इंदोरीकर महाराज यांच्या वकिलांचे म्हणणे रास्त ठरवत जिल्हा न्यायालयाने इंदोरीकर महाराजांना निर्दोष मुक्तता केली होती. इंदोरीकर महाराज यांचे वक्तव्य पीसीपीएनडीटी एक्ट नुसार गुन्हा असल्याचं बाजू सरकार आणि अनिसच्या वतीने मांडण्यात आली होती. मात्र, इंदोरीकर महाराज यांनी केलेल्या वक्तव्यावर कोणत्याही प्रकारची जाहिरात नव्हती.

त्यास ग्रंथाचा आधार होता, हे ग्राह्य धरत कोर्टाने इंदोरीकर महाराजांच्या बाजूने निकाल दिले होते. आमची लढाई कोणा व्यक्ती विरोधात नाही, तर प्रवृत्ती विरोधात आहे. अशा प्रवृत्तीना वेळेतच पायबंद घालायला हवा, असे म्हणत या निर्णयाच्या विरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही हायकोर्टामध्ये धाव घेतली होती.

आता त्या पाठोपाठ सरकारी पक्षाच्या वतीने देखील जिल्हा सत्र न्यायालयाच्या निर्णयाला औरंगाबाद हायकोर्टातमधून आव्हान दिले आहे. सरकारी पक्षाच्या वतीने खंडपीठात याचिका देखील दाखल करण्यात आली आहे. आता हायकोर्टात परत एकदा इंदोरीकर महाराज यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर खल होणार असून हायकोर्ट परत इंदोरीकर महाराजांना दिलासा देणार की नाही का दोषी ठरवणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर अपघाताचा थरार, एकमेकांना धडक देत २ वाहने दरीत कोसळली

Women Health Tips: मैत्रीण किंवा बहिणीवर विश्वास असला तरी या ७ वस्तू कधीही शेअर करु नका; जाणून घ्या कारणं

5 Uses of Used Tea Powder: चहा केल्यानंतर उरलेली चहापावडर फेकून देताय? जाणून घ्या तिचे हे 5 जबरदस्त फायदे, घर होईल चकाचक!

Maharashtra News Live Update: कोल्हापूर जिल्हा बँकेच्या सभेत हसन मुश्रीफ-सतेज पाटील यांच्यात टोलेबाजी

शाही मशिदीवरून वाद पेटला; पोलिसांवर मोठ्या प्रमाणात दगडफेक, अश्रुधूराच्या नळकांड्या फोडल्या

SCROLL FOR NEXT