जळगाव हादरलं! चपातीसाठी भावानेच केला चुलत भावाचा खून  Saam Tv
महाराष्ट्र

जळगाव हादरलं! चपातीसाठी भावानेच केला चुलत भावाचा खून

जळगाव जिल्ह्यामधील यावल तालुक्यात नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना घडली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

यावल : जळगाव जिल्ह्यामधील यावल तालुक्यात नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. या ठिकाणी एका तरुणाने आपल्या दोन चिमुकल्या चुलत भावांना विहिरीत टाकून त्यांचा जीव घेतला आहे. चुलत भावाच्या दिलेल्या जबाबात तफावत आढळल्यामुळे पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेत चौकशी केली आहे, आरोपीने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.

जेवणात एकच चपाती दिल्याच्या रागातून आपण हा गुन्हा केल्याचे आरोपीने कबुल केले आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली असून प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. निलेश सावळे असे अटक केलेल्या आरोपी चुलत भावाचे नाव आहे. तर रितेश रवींद्र सावळे (वय-६) आणि हितेश रवींद्र सावळे (वय- ५) असे हत्या झालेल्या चिमुकल्या भावंडाची नावे आहेत. आरोपी निलेश सावळे हा मृत रितेश आणि हितेश यांचा चुलत भाऊ आहे.

हे देखील पहा-

पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील चुंचाळे येथील रहिवासी असणाऱ्या रवींद्र मधुकर सावळे आणि उज्ज्वला सावळे या दाम्पत्यास रितेश आणि हितेश अशी २ अपत्ये आहेत. फिर्यादी रवींद्र यांची चुंचाळे शेतशिवाराला लागून राहत होते. सावळे दाम्पत्य बुधवारी सकाळी आपल्या दोन्ही बालकांना घेऊन शेतात गेले होते. यावेळी रवींद्र सावळे यांचा पुतण्या निलेश देखील त्यांच्या बरोबर होता.

दरम्यान दुपारच्या सुमारास काम झाल्यानंतर, सावळे दाम्पत्यांनी आपल्या दोन्ही मुलांना जेवण करण्याकरीत आवाज दिला होता. पण दोन्ही भावांचा काहीही थांगपत्ता लागत नव्हता. अनेक ठिकाणी शोधाशोध केल्यानंतर सावळे यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन, संशयित आणि नातेवाईकांची कसून चौकशी केली आहे.

दरम्यान चुलत भाऊ निलेश सावळे याच्या जबाबात पोलिसांना तफावत आढळून आली. यामुळे पोलिसांनी आरोपी निलेशला ताब्यात घेत, त्याची कसून चौकशी केली आहे. यावेळी घाबरलेल्या आरोपीने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. संबंधित मृत चिमुकल्यांनी आपल्याला नोकरासारखी वागणूक देत जेवणात एकच चपाती दिल्याच्या रागामधून हत्या केल्याची कबुली दिली आहे. गुरुवारी दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास दोन्ही मुलांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Fort : गर्दीपासून दूर, सह्याद्रीच्या कुशीत! नाशिकमधील ७ ऑफबीट किल्ल्यांवर दिवाळीत भटकंती करा

Maharashtra News Live Update: पुण्याच्या मुळशी तालुक्यातील कोंढावळे येथील हॉटेलमध्ये तोडफोड

Maharashtra Politics: भाजपची मोठी खेळी! शरद पवारांना मोठा धक्का, बड्या नेत्याने समर्थकांसह हाती घेतलं 'कमळ'

Morning Breakfast Recipe: नाश्त्याला दररोज मोड आलेले कडधान्ये खाल्ले तर शरीराला काय फायदा होतो?

Weather Update : पाऊस थैमान घालणार! पुढील ८ तास महत्त्वाचे; १३ राज्यांना अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT