Rajesh Tope Saam Tv
महाराष्ट्र

तृतीयपंथी यांच्या उपचारासाठी स्वतंत्र वार्ड करणार स्थापन, आरोग्यमंत्र्यांनी दिले निर्देश

या बैठकीत तृतीय पंथीयांच्या उपचारासाठी स्वतंत्र वार्ड, रूम देण्याबाबत आराखडा तयार करून सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

लक्ष्मण सोळुंके

जालना - तृतीय पंथीयांच्या (Transgender)आरोग्य विषयक प्रश्नांसंदर्भात मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीत तृतीय पंथीयांच्या उपचारासाठी स्वतंत्र वार्ड, रूम देण्याबाबत आराखडा तयार करून सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली.

हे देखील पहा -

काल राज्यातील तृतीयपंथीयांच्या प्रश्नासंदर्भात मंत्रालयात बैठक झाली असून त्यांच्यावर उपचारासाठी मेडिकल कॉलेज आणि शासकीय रूग्णालयात स्वतंत्र वार्ड तसेच स्वतंत्र रूम देण्यासंदर्भात स्वतंत्र धोरण तयार करण्यासाठी आराखडा तयार करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्याना देण्यात आल्याची माहिती देखील टोपे यांनी दिली आहे. ते जालन्यात बोलत होते.

तृतीय पंथीयांना वेगवेगळ्या प्रकारच्या शस्त्रक्रिया करायच्या असून शासकीय रुग्णालयात उपचार घेताना त्यांना वेगवेगळ्या अडचणी येतात त्यामुळे त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालय तसेच मेडिकल कॉलेज मध्ये स्वतंत्र वार्ड तसेच रूम मिळण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आराखडा तयार करून सादर करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे देखील टोपे यांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अधिकाऱ्याची मंत्री बावनकुळे यांनी शेतात घेतली शाळा

Maharashtra Fort : घनदाट जंगलात ३२०० फूट उंचीवर वसलाय 'हा' ऐतिहासिक किल्ला, ट्रेकिंगसाठी नक्की जा

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देणार! सरकारचं मोठं आश्वासन; भविष्यातील पाणी, चारा...;

Housing Society : फ्लॅटधारकांसाठी मोठी बातमी! आता ३ वर्षांत पुनर्विकास पूर्ण करावाच लागणार; नवीन नियम लागू

Tyres Black Colour : वाहनांचे रंग आणि डिझाइन बदलते, मग टायर नेहमी काळ्या रंगाचेच का असतात? जाणून घ्या रंजक कारण

SCROLL FOR NEXT