Devendra Bhuyar Saam Tv
महाराष्ट्र

'पंचतारांकीत हॉटेलमध्ये राहायला मिळालं, हातभर गादीवर झोपायला मिळालं', अन्यथा...; देवेंद्र भुयार म्हणाले....

विधान परिषदेच्या निवडणुकीत दगाफटका होऊ नये, म्हणून सर्वच पक्षांकडून आमदारांची विशेष काळजी घेतली जात आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : विधान परिषदेच्या (Vidhan Parishad Election) १० जागांसाठी आज निवडणूक होत असून सकाळपासून मुंबईच्या विधान भवनात मतदान सुरु आहे. राज्यसभा निवडणुकीनंतर आता विधान परिषद निवडणूकीत भाजप आणि महाविकास आघाडीत (Maha Vikas Aghadi) राजकीय संघर्ष सुरु आहे. महाविकास आघाडीचे सहा आणि भाजपचे (BJP) पाच उमेदवार रिंगणात असून मोठा रणसंग्राम सुरु आहे. या निवडणुकीत दगाफटका होऊ नये म्हणून सर्वच पक्षांकडून आमदारांची विशेष काळजी घेतली जात आहे.

दरम्यान, राज्यसभेप्रमाणेच विधान परिषद निवडणुकीतही खारीचा वाट उचलणाऱ्या अपक्ष आमदारांचे मतदानाला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे. राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांनी अपक्ष आमदार देवेंद्र भुयार (Devendra Bhuyar) यांच्यावर मतदानावरुन निशाणा साधला होता. त्यामुळे आता विधान परिषद निवडणुकीत खुद्द देवेंद्र भुयार यांनी त्यांची मतदानाची भूमिका स्पष्ट केली आहे.

विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाचा देवेंद्र भुयार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी ते म्हणाले, विधान परिषदेच्या निवडणुकीमुळे पंचतारांकीत हॉटेलमध्ये राहायला मिळालं, हातभर गादीवर झोपायला मिळालं, अन्यथा कोण आम्हाला कोण विचारत होतं,मतं देऊनही गैरसमज पसरवले गेले.मात्रस आताही सांगत आहे मत महाविकास आघाडीला दिलं आहे, अशी प्रतिक्रिया राज्यसभा निवडणुकीत संशय व्यक्त केलेल्या अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, राज्यसभा निवडणुकीतही भुयार यांच्या नावाची तुफान चर्चा सुरु होती. त्यावेळी संजय राऊत यांनी भुयार यांच्यावर मतदानावरुन निशाणा साधला होता. त्यानंतर देवेंद्र भुयार यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवसास्थानी जावून त्यांची भूमिला स्पष्ट केली होती. त्यावेळी भुयार यांनी दिलेली प्रतिक्रिया अशी की, मी संजय राऊत यांच्या पक्षातून निवडून आलेलो नाही.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसोबत राहून निवडून आलो आहे,मग मी गद्दारी कशी केली? मी संजय राऊत यांच्या आघाडीसोबत पूर्वीपासून जोडलेला आहे.मी लोकसभा निवडणुकीपासून राष्ट्रवादी काँग्रेससोबत काम करत असून संजय राऊत आणि त्यांचा पक्ष तर विधानसभा निवडणुकीनंतर आघाडीसोबत आलो, असं वक्तव्य अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी केलं होतं.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT