saam tv
saam tv
महाराष्ट्र

Satara: वांग- मराठवाडी धरणावर धरणग्रस्तांचे बेमुदत उपोषण सुरू

ओंकार कदम

सातारा : सातारा (satara) जिल्ह्यातील पाटण (patan) तालुक्यातील वांग- मराठवाडी धरणावर धरणग्रस्तांचे बेमुदत उपोषण (hunger strike) सुरू आहे. जमिनी ऐवजी रोख रक्कमेच्या मागणीसाठी जिंती (jinti) येथील १३४ खातेदार आक्रमक झाले असून त्यांनी धरणाच्या (dam) जलाशयाच्या काठावरच ठिय्या (aandolan) ठोकला आहे. (satara latest marathi news)

वांग मराठवाडी धरणाचे बांधकाम २५ वर्षानंतर पूर्णत्वाकडे पोहचलेले असले तरी जिंती येथील १३४ कुटुंबांचा प्रश्न तसाच राहिलेला आहे. सांगली (sangli) जिल्ह्यातील हातनोली येथे जिंती येथील धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचे प्रयोजन असले तरी अन्य प्रकल्पग्रस्तांप्रमाणे जमिनी ऐवजी रोख रक्कमेची मागणी या खातेदारांची आहे.

जो पर्यंत मागणीवर निर्णय होत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही. आमच्यासाठी ही आर या पारची लढाई असून जीव गेला तरी चालेल परंतु मागणीवर निर्णय घेवूनच धरण स्थळावरुन उठू तसा निर्धार आंदोलनकर्त्यांनी साम टीव्हीशी बाेलताना व्यक्त केला आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Murbad Railway Line: कल्याण मुरबाड रेल्वेच्या भूसंपादनाला शेतक-यांचा विरोध, पाेलिसांच्या मध्यस्थीनंतर आंदाेलन शमले

Herbal Tea पिणं आरोग्यासाठी लाभदायी

Accident News: भरधाव पिकअप अनियंत्रित होऊन टेम्पोला धडकला; भीषण अपघातात ९ जणांचा जागीच मृत्यू, थरारक VIDEO

Tulsi Vastu Tips: सकाळी तुळशीला पाणी घालण्याची योग्य वेळ काय?

Today's Marathi News Live : महाविकास आघाडीची उद्या सेनाभवनमध्ये संविधान वाचवा सभा

SCROLL FOR NEXT