Indapur Gopichand Padalkar News Saam Tv
महाराष्ट्र

Gopichand Padalkar: गोपीचंद पडळकर चप्पलफेक प्रकरणी मोठी अपडेट; १० ते १५ आंदोलकांवर गुन्हे दाखल

Indapur Gopichand Padalkar News: पुण्यात आंदोलकांनी चप्पलफेक केल्यानंतर यावरून राजकीय वातावरण देखील बरंच तापलं. या घटनेनंतर काही ठिकाणी आंदोलने देखील करण्यात आलं.

Ruchika Jadhav

मंगेश कचरे

Indapur Gopichand Padalkar News:

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर झालेल्या चप्पलफेक प्रकरणी मोठी अपडेट समोर आलीये. भाजपाचे नेते गोपीचंद पडळकर यांच्यावर चप्पलफेक करणाऱ्या अज्ञात आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत. १० ते १५ आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले आहेत.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नेमकं काय घडलं होतं?

पुण्यातील (Pune) इंदापुरात ओबीसी एल्गार मेळाव्यानंतर उपोषणाला बसलेल्या कार्यकर्त्यांना गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) भेटण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्यावर ही चप्पलफेक झाली होती. पुण्यात आंदोलकांनी चप्पलफेक केल्यानंतर यावरून राजकीय वातावरण देखील बरंच तापलं. या घटनेनंतर काही ठिकाणी आंदोलन देखील करण्यात आलं.

आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर झालेल्या चप्पल फेकीच्या हल्ल्याच्या निषेधार्थ धनगर समाज आक्रमक झाला होता. चप्पल फेकीच्या या घटनेमुळे काहीकाळ जालना शहरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

अंबड -पैठण महामार्गावर टायर जाळून रास्तारोको

या घटनेचे पडसाद काल अंबडमध्येही उमटले. रविवारी सकाळी शिरनेर गावात अंबड -पैठण महामार्गावर टायर जाळून रस्ता रोको आंदोलन करत धनगर समाजाच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. अंबड- पैठण महामार्गावरील शिरनेर गावात धनगर समाजाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत रस्त्यावर टायर जाळून रास्तारोको केल्याने काही काळ या परिसरात वाहतूक ठप्प झाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunita Ahuja: न गोविंदा, न मुलं… सुनीता आहूजाने एकटीनेचं केलं गणरायाचं स्वागत; डान्सचा व्हिडिओ व्हायरल

Maharashtra News Live Update: गावा गावातून मराठा बांधव आक्रमक, मुंबईच्या दिशेने निघण्याची तयारी सुरू

Green leafy vegetables: 'ही' हिरवी पानं ठेवतील तुम्हाला फिट आणि निरोगी; रोजच्या आहारात आजच करा या पालेभाज्यांचा समावेश

Manoj Jarange: मनोज जरांगे आज मोठा निर्णय घेणार, मुंबई पोलिसांनी आंदोलनाची परवानगी नाकारली

Ganeshotsav 2026 : गणरायाच्या आगमनाने महाराष्ट्र भक्तिमय, मुंबईपासून कोकणापर्यंत उत्साहाला उधाण

SCROLL FOR NEXT