IND vs AUS Cricket Match Betting Nagpur  Saam TV
महाराष्ट्र

IND vs AUS Match Betting : भारत-ऑस्ट्रेलिया टेस्ट मॅचवर सट्टा; पोलिसांनी भर मैदानातून ४ जणांना उचललं

क्रिकेट सामन्यावर सट्टा लावणाऱ्या चार जणांना नागपूर पोलिसांनी भर मैदानातूनच अटक केली आहे.

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

IND vs AUS Cricket Match Betting Nagpur : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा पहिला कसोटी सामना नागपुरातील जामठा मैदानावर खेळवला जात आहे. आज या सामन्याचा दुसरा दिवस असून सामना पाहण्यासाठी क्रिडाप्रेमींनी मैदानावर मोठी गर्दी केली आहे. अशातच, क्रिकेट सामन्यावर सट्टा लावणाऱ्या चार जणांना नागपूर पोलिसांनी भर मैदानातूनच अटक केली आहे. (Latest Sports Updates)

अचानक पोलिसांनी मैदानावर जाऊन सट्टेबाजांना अटक केल्यानंतर काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. मात्र, या चार जणांना पोलिसांनी मोठ्या शिताफीने बाहेर काढत अटक केली आहे. अटक करण्यात आलेले चारही आरोपी हे मुंबई तसेच नागपुरातील असल्याची माहिती आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia)  यांच्यातील पहिला कसोटी सामना नागपुरातील जामठा मैदानावर खेळवला जात आहे. हा क्रिकेट सामना पाहण्यासाठी राज्यभरातून अनेक क्रिकेटप्रेमी नागपुरात दाखल झाले आहेत. अशातच, क्रिकेटचा सामना पाहण्याचा बनाव करून चार आरोपी हे मैदानावर बसून सट्टा लावत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली.

पोलिसांनी (Police) तातडीने सापळा रचून या चार आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्टेडियममध्ये प्रत्यक्ष सुरू असलेली मॅच आणि टीव्ही वरती लाईव्ह दिसत असलेल्या मॅच मध्ये तीन ते चार सेकंदाचा फरक असतो.

या Telecast Delay टाईम चा वापर करून सट्टा बाजारात सट्टा खेळण्याचा प्रयत्न हे चौघे करत होते. चारही आरोपी मैदानावरील सामन्याची माहिती बाहेर बसलेल्या साथीदारांना देत होते. सध्या या चारही आरोपींनी पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या इतर साथीदारांचा शोध घेतला जात आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navi Mumbai: नवी मुंबईत भाजपचा स्वबळाचा नारा? महापौर आमचाच होणार, गणेश नाईकांचा दावा

Sunday Mega Block : रविवारी मुंबईकरांचे 'मेगा'हाल होणार, ३ मार्गावर मेगाब्लॉक, जाणून घ्या रेल्वेचे वेळापत्रक

Maharashtra Live News Update : अंबरनाथमध्ये मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप

Nagarparishad Election: बारामती, फलटण, अंबरनाथसह २३ नगरपरिषद- नगरपंचायतीसाठी आज मतदान, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; उद्या निकाल

Municipal Election : अंबरनाथमध्ये शिंदेंचे बोगस मतदार, मंगल कार्यालयात शेकडो महिला आढळल्या, भाजप-काँग्रेसचा आरोप

SCROLL FOR NEXT