Zika Virus Saam Tv
महाराष्ट्र

Zika Virus Symptoms VIDEO: झिकाकडे दुर्लक्ष कराल,जीवाला मुकाल? महिलांना सर्वात जास्त धोका? जाणून घ्या लक्षणे

Zika Virus Symptoms in Marathi: भयंकर असा जीवघेणा व्हायरस महाराष्ट्रात थैमान घालतोय. लहानग्यांपासून ते वयोवृद्धांना याचा धोका आहे. धक्कादायक बाब म्हणजे गर्भवती महिलेला हा व्हायरस झाला तर बाळावरही गंभीर परिणाम होऊ शकतो.

Tanmay Tillu

कोरोनाच्या भयंकर आठवणी आजही मनात ताज्या आहेत, त्यात झिका व्हायरसनं टेन्शन वाढवलंय. राज्यभरात झिका हातपाय पसरू लागलाय. झिकाने थैमान घातलंय. पुण्यातून याची सुरुवात झालीये. झिकाची लागण एखाद्या व्यक्तीला झाली तर त्याची लागण इतरांना होतेय. त्यामुळे झिकाकडे दुर्लक्ष केलं तर जीवावरही बेतू शकतं. यात सर्वात मोठा धोका आहे तो म्हणजे महिलांना.

धक्कादायक बाब म्हणजे गर्भवती महिलेला झिका झाल्यास तिच्या बाळावरही गंभीर परिणाम होऊ शकतात. तर गर्भवती महिलांनाही झिकाचा धोका आहे.. लहान मुलं, वयोवृद्धांनी झिकापासून सावध राहण्याची गरज आहे. झिका झालाय हे कसं ओळखायचं, हे जाणून घेऊ...

झिका व्हायरसची लक्षणे काय?

  • सांधे दुखी, डोकेदुखी, ताप

  • डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागाचा होणारा दाह किंवा लाल डोळा

  • पुरळ, स्नायूंमध्ये वेदना

  • संसर्गाची लक्षणे एक आठवडा टिकू शकतात

  • अनेकांना संसर्ग झाल्याचे समजत नाही

ही झिकाची लक्षणं आहेत. यातील एक जरी लक्षण आढळलं तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. कारण पावसाचे दिवस आहेत. रोगराई पसरतेय, त्यात दुर्लक्ष झालं तर झिकाचे परिणाम गंभीर होऊ शकतात.

झिकाला रोखण्यासाठी काय करायला हवं? झिकापासून कसा कराल बचाव?

  • झिकावर अद्याप कोणतीही लस नाही

  • झिकाचा प्रसार रोखण्यासाठी डासांची पैदास रोखा

  • औषधांची फवारणी करावी

  • घाण पाणी,कचरा साचू देऊ नका

देशभरात 66 शहरात झिका आढळल्यानं आरोग्य विभाग अलर्ट झालंय. झिका कुणालाही होऊ शकतो. लहानग्यांपासून वृद्धांपर्यंत याचा सर्वाधिक धोका गर्भवतींना असल्याने घरात गर्भवती महिला असल्यास अधिक काळजी घ्या. सावध राहा, सतर्क राहा...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: संजय राऊत यांनी शिवीगाळ केल्याने काही फरक पडत नाही - भरत गोगावले

Stomach cancer: दररोजच्या या ४ सवयी लावाच; पोटाच्या कॅन्सरचा धोका होतो ५० टक्क्यांनी कमी

Suhasini Mulay: सोशल मीडियावरून जुळल्या मनाच्या तारा; ६०व्या वर्षी प्रेमात पडली अभिनेत्री, अवघ्या ७५ दिवसांत बांधली लग्नगाठ

तांदूळ, ज्वारी की बाजरी? डायबिटीजच्या रूग्णांनी कोणती भाकरी खावी?

Cable Stayed Bridge : खुशखबर! ठाणे-नवी मुंबई प्रवास अवघ्या काही मिनिटांत होणार; कोपरी ते पटनीदरम्यान पूल उभारला जाणार, कसा असेल मार्ग?

SCROLL FOR NEXT