Nashik  Saam Tv
महाराष्ट्र

Breaking: नाशिकमध्ये पवन एक्स्प्रेसचे ७ ते ८ डब्बे रुळावरून घसरले

नाशिकमध्ये पवन एक्स्प्रेसचे ७ ते ८ डब्बे रुळावरुन घसरल्याची दुर्घटना घडली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

तबरेज शेख

नाशिक : नाशिक रोड रेल्वे स्टेशन जवळ असणार्‍या लहवित जवळ रेल्वेचे डबे लाईन तुटून पडल्याची माहिती मिळत आहे. अनेक लोक यामध्ये जखमी झाले आहेत. रेल्वे पोलिस (Police) आणि आर पी एफ घटनास्थळी याठिकाणी मार्गक्रमण करत आहे. अशी माहिती मिळाली आहे. पवन एक्सप्रेस (Pawan Express) नाशिकच्या १२ कि.मी पाहिले रुळावरून खाली उतरली आहे. काही लोक गंभीर जखमी झाले आहेत.

हे देखील पहा-

नाशिकजवळील (Nashik) लहवित- देवळाली स्थानकाच्या दरम्यान लोकमान्य टिळक टर्मिनस- जयनगर एक्स्प्रेसचे काही डबे रुळावरुन घसरल्याची धक्कादायक घटना रविवारी दुपारी घडली आहे. या अपघातात काही प्रवासी जखमी झाले असून रेल्वे पोलिस, वैैद्यकीय पथक घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत.

रविवारी दुपारी ३ वाजून १० मिनिटांच्या सुमारास नाशिकजवळील लहवित- देवळाली या स्थानकादरम्यान डाऊन मार्गावर एलटीटी - जयनगर एक्स्प्रेसचे डबे रुळावरुन घसरले आहेत. रेल्वे रुळाला तडे गेल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंंदाज आहे. मात्र, अपघाताचे नेमके कारण काय, याविषयी रेल्वेकडून अद्याप स्पष्टीकरण देण्यात आले नाही. मध्य रेल्वेने ट्विटरवर अपघाताची माहिती दिली असून यात मदत पथक घटनास्थळी रवाना झाल्याचे सांगितले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Investment Plan Fact Check: 22 हजार गुंतवा, रोज 90 हजार कमवा? अर्थमंत्र्यांच्या घोषणेचा व्हिडिओ व्हायरल?

Skin Care Tips : ऑक्टोबर हिटमध्ये चेहरा काळा पडतोय? लगेच करा 'हे' ६ सोपे उपाय; त्वचेचा ग्लो तसाच राहील

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

SCROLL FOR NEXT