धुळ्यात चोरट्याने पैश्यांची बॅग हिसकावून केला पोबारा  भूषण अहिरे
महाराष्ट्र

धुळ्यात चोरट्याने पैश्यांची बॅग हिसकावून केला पोबारा

धुळ्यात रात्रीच्या वेळी पादचाऱ्यांना लुटण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भूषण अहिरे

धुळे : धुळ्यात रात्रीच्या वेळी पादचाऱ्यांना लुटण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असताना, धुळे शहरातील लोकमान्य हॉस्पिटल जवळील चौकामध्ये पायी चालणाऱ्या युवकाच्या हातातून पैशांची बॅग हिसकावून चोरट्याने पोबारा केल्याची घटना उघडकीस आली आहे. In Dhule, thief snatched a bag of money

धुळे शहरातील भंगाराच्या व्यापाऱ्याने मालेगाव येथून आपली पाच लाख पंधरा हजारांची रक्कम आपल्याकडे कामावर असलेल्या साबीर खाटीक या नोकराच्या माध्यमातून मागवली असता मालकाने सांगितल्याप्रमाणे साबीर खाटीक याने पाच लाख पंधरा हजार रुपयांची रक्कम मालेगाव येथून ट्रॅव्हल बस मधून आणली होती. शहरातील लोकमान्य हॉस्पिटलच्या चौकात अज्ञात चोरट्याने लक्ष ठेवून अंधाराचा फायदा घेत रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास झडप टाकून पैशांची बॅग हिसकावून पोबारा केला आहे.

याबाबत आझाद नगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देण्यात आल्यानंतर पोलिसांनी रात्री चोरट्याचा शोध घेतला. परंतु, अद्याप हा भामटा चोर पोलिसांना सापडला नसून अज्ञात चोरट्याविरुद्ध आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

६ मतदारसंघ, एकच लक्ष्य; बंडखोरांविरोधात ठाकरेंची मोहीम, संपूर्ण दौऱ्याचे वेळापत्रक आले समोर

Today Horoscope : 'या' ४ राशींना आज नोकरी-व्यवसायात मिळणार गुड न्यूज; वाचा तुमचे राशिभविष्य

Yoga For Acidity: सतत Acidity चा त्रास होतोय? हे १ योगासन करेल तुमच्या सगळ्या समस्या दूर

Maharashtra News Live Update: खासदार ओमराजे निंबाळकर धाराशिवला जाणार

Hingoli Crime: प्रेमाची थाप मारून पळवून नेलं; नंतर प्रियकर आणि बापाने केले अत्याचार

SCROLL FOR NEXT