Akola Crime: नवरा बायकोचा वाद सासूच्या जीवावर उठला; जावयाने सासूला विहिरीत टाकले जयेश गावंडे
महाराष्ट्र

Akola Crime: नवरा बायकोचा वाद सासूच्या जीवावर उठला; जावयाने सासूला विहिरीत टाकले

हा वाद सासूबाई यांच्या जीवावर उठला

अॅड. जयेश गावंडे

अकोला: आपल्या मुलीचा आणि जावयाचा नेहमी होणारा वाद सासूच्या जीवावर उठल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील (Akola) बाळापूर पोलीस (Police) स्टेशनच्या हद्दीतील वाडेगाव (Wadegaon) येथे घडली आहे. जावयाने सासूला १६० फूट खोल विहिरीत टाकून तिची हत्या (killing) केली आहे. याप्रकरणी आरोपी (Accused) जावयाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आरोपी जावई सध्या फरार झाला आहे.

हे देखील पहा-

पोलीस (Police) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बाळापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वाडेगाव येथील एका शेतात (Farm) डाखोरे परिवार राखनदारीचे काम करण्यासाठी राहतो. चंद्रकला डाखोरे हिचा जावई विलास बळीराम इंगळे याचे त्याच्या पत्नीबरोबर म्हणजेच चंद्रकला डाखोरे हिच्या मुलीसोबत नेहमी वाद (Argument) होत होते. वाद मिटवण्यासाठी सासू चंद्रकला डाखोरे नेहमी प्रयत्न करत असत. मात्र, हाच वाद सासूबाई यांच्या जीवावर उठला आहे. जावई आणि सासू यांच्यात वाद होऊन जावयाने मारहाण केली होती.

दरम्यान दोघांचा वाद विकोपाला गेल्याने जावई विलास इंगळे याने त्याची सासूला १६० फूट खोल विहिरीत टाकून तिची हत्या केली आहे. ही घटना घडत असताना आरोपीचा २ ते ३ वर्षांचा मुलगा घाबरून तिथून पळून गेला आहे. आणि तोही वाचला या घटनेची आपबिती या लहान मुलाने सांगितली आहे. या घटनेबाबत स्थानिक शेतकरी याची माहिती पोलिसांना दिली आहे.

यावरून बाळापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार भाऊराव घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस घटनास्थळी पोहचून मृतक महिला चंद्रकला बळीराम डाखोरे यांना विहिरीतून बाहेर काढून पंचनामा करण्यात आला आहे. यानंतर त्यांचे मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात आले आहे. या घटनेतील आरोपी विलास मारोती इंगळे (वय- ३५) हा आजून देखील फरार असून पुढील तपास बाळापूर पोलीस करीत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission : कामाची बातमी! केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या टेक होम पगारात मोठी वाढ? सरकार लागू करू शकतं हा फॉर्म्यूला

Maharashtra News Live Update: जालन्यात पोलिस-महसूलच्या पथकाचा वाळू माफियांना दणका, 3 हायवा, ट्रॅक्टरसह 64 लाखांचा मुद्देमाल जप्त

वजन वाढणारच नाही! सकाळी नाश्त्याला अरबट-चरबट खाण्यापेक्षा खा 'हे' 4 हाय-प्रोटीन पदार्थ; दिवसभर राहाल फिट

Paranoia symptoms: प्रत्येक गोष्टीत कटकारस्थान दिसतंय? तज्ज्ञांनी सांगितली पॅरानोइयाची धोकादायक लक्षणं आणि कारणं

Helmet importance: बाईकवर फिरायला जाण्यापूर्वी हेल्मेटबाबत ही एक चूक टाळा

SCROLL FOR NEXT