अकोल्यात शिवसेनेच्या उपशहरप्रमुखासह तिघांविरोधात गुन्हा दाखल जयेश गावंडे
महाराष्ट्र

अकोल्यात शिवसेनेच्या उपशहरप्रमुखासह तिघांविरोधात गुन्हा दाखल

शहरातील एका युवकाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणात शिवसेनेचे शहर उपप्रमुख यांच्यासह तिघांवर जुने शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जयेश गावंडे

अकोला : शहरातील एका युवकाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणात शिवसेनेचे शहर उपप्रमुख यांच्यासह तिघांवर जुने शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये शिवसेना शहर उपप्रमुख योगेश अग्रवाल आणि सुशील दांदळे यांना अटक करण्यात आली आहे. तर विशाल पुरोहित हा फरार झाला आहे.

हे देखील पहा -

जुने शहरातील जयहिंद चौक परिसरात अल्पेश अरविंद उपाध्याय हा राहतो. अल्पेश हा योगेश अग्रवाल, सुशील दांदळे आणि विशाल पुरोहित यांच्याशी संपर्कमध्ये नेहमीच होता. त्यांच्यामध्ये पैशांचा व्यवहार असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. त्यामुळे त्यांच्यात या कारणावरून वाद ही झाले होते. हे तिघे अल्पेश यास त्रास देत होते. त्यामुळे त्याने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

त्याने आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. त्या चिठ्ठीत त्याने 'योगेश अग्रवाल, सुशील दांदळे आणि विशाल पुरोहित यांची नावे लिहली आहेत. कोरोना के कारण उपरवालोके प्रेशर के कारण मै ये गलत काम कर रहा हु, जय गजानन. मैने सबकी हेल्प की. पर मेरे बुरे समय मे कोई साथ नही आया' असे नमूद केले आहे.

याप्रकरणी सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये पोलिसांनी योगेश आणि विशाल या दोघांना अटक केली आहे. यातील तिसरा आरोपी अद्यापही फरार आहे. पुढील तपास जूने शहर पोलिस निरीक्षक श्रीरंग सणस करत आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

Kidney Health: राजमा खाल्ल्याने किडनी खरोखरच दुरुस्त होते का? 'हा' धक्कादायक खुलासा वाचून चकित व्हाल

Amla juice: सकाळी रिकाम्या पोटी प्या एक ग्लास आवळ्याचा रस; मिळतील हे 4 फायदे

Mumbai Crime: गार्डमध्ये जाऊन ड्रग्जचं इंजेक्शन घेतलं, मुंबईत तरुणाचा तडफडून मृत्यू

SCROLL FOR NEXT