Bhandara Schools and Colleges Shut Down Following IMD’s Red Alert for Heavy Rainfall  saam tv
महाराष्ट्र

Bhandara News: हवामान विभागाकडून भंडाऱ्याला रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा, कॉलेजला सुट्टी

IMD Rain Red Alert Bhandara: भंडारा जिल्ह्यात हवामान विभागानं रेड अलर्ट दिलाय. दोन दिवसापासून जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे दक्षता म्हणून भंडाऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व शाळांना उद्या सुट्टी जाहीर केलीय.

Bharat Jadhav

भंडारा जिल्ह्यात हवामान विभागानं रेड अलर्ट दिलाय. दोन दिवसापासून जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडतोय. दक्षता म्हणून भंडारा जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व शाळांना उद्या सुट्टी जाहीर केलीय. भंडारा जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये. तसेच अतिवृष्टीमुळे आपतकालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होऊ नये याकरिता जिल्हातील सर्व अंगणवाडी, शाळा व महाविद्यालये मधील विद्यार्थाना उद्या सुट्टी देण्यात आलीय.

विदर्भात पावसाने जोरदार हजेरी लावलीय. अनेक जिल्ह्यांतील जनजीवन विस्कळीत झालेत. या पार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलाय. जिल्हाधिकाऱ्यांनी भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यांतील शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर केलीय. यासंदर्भात संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकृत आदेश जारी केलेत.

हवामान विभागाने २५ जुलै रोजी भंडारा जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जाहीर केलाय. अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेता जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते यांनी खबरदारीचा उपाय म्हणून सर्व शाळा, अंगणवाड्या, महाविद्यालये तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना सुट्टी जाहीर केलीय. विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षिततेचा विचार करत ही निर्णय घेण्यात आलाय.

चंद्रपूर जिल्ह्यातील प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांनी देखील रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर शाळा, महाविद्यालये, खासगी कोचिंग क्लासेस आणि अंगणवाड्यांना २५ जुलै रोजी सुट्टी जाहीर केली आहे. अतिवृष्टीच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, राज्यभरात अनेक भागांत जोरदार पाऊस झाल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे. मात्र काही भागांमध्ये अजूनही पावसाची प्रतीक्षा असल्याने बळीराजा आभाळाकडे डोळे लावून बसला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: चाकणच्या घटनेनंतर शिरूरमध्येही महिलेवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला

Halwai Style Jalebi: सण किंवा खास प्रसंगी घरच्या घरी बनवा हलवाईसारखी केशर जिलेबी; नोट करा ही सोपी रेसिपी

रंग गोरा करण्याचा दावा करणाऱ्या पाकिस्तानी क्रीममागे दहशतवाद्यांचा काळा चेहरा? नांदेडमधील FDA कारवाईनंतर ATS ची एन्ट्री होणार?

Blue Jeans Ban: 'या' देशात निळी जीन्स घातल्यास होतो तुरुंगवास?

आधी वहिनीचं डोकं दगडानं ठेचलं; नंतर भावाचा जेथे मृतदेह सापडला होता तेथेच घेतला गळफास, दुहेरी हत्याकांडाचं गूढ काय?

SCROLL FOR NEXT