Rainfall Saam TV
महाराष्ट्र

IMD Rain Alert : राज्यात पुढचे २ दिवस अतिमुसळधार पाऊस; हवामान खात्याने या जिल्ह्यांना दिला रेड अलर्ट

Rain News : राज्यात पुढील दोन दिवस पावसाचं जोर वाढणार असून काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. त्यामुळे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता आहे.

Sandeep Gawade

राज्यातील अनेक जिल्ह्यांना जुलै महिन्यात पावसाने झोडपून काढलं आहे. काही भागातील पूर अद्यापही ओसरलेला नसताना पुन्हा हवामान खात्याने पावसाचा इशारा दिला आहे. राज्यात पुढील दोन दिवस पावसाचं जोर वाढणार असून काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. त्यामुळे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हवामान खात्याने संपूर्ण कोकणासाठी ऑरेंज अलर्ट जारी देण्यात आला आहे. तर मुंबई, ठाण्यात आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुणे आणि साताऱ्यातील घाट परिसरात काही भागात अतिवृष्टीची शक्यता आहे. त्यामुळे साताऱ्यातील घाट परिसरासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भात देखील सर्वत्र विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे.

गेल्या आठवड्यात मुसळधार पावसामुळे पुणेकरांची अक्षरश: दाणादान उडाली. मुळा-मुठा नद्यांचं पाणी नागरी वस्त्यांमध्ये पाणी शिरलं होतं. खडकवासला आणि इतर धरणांमधून पाण्याचा विसर्ग थोडा कमी झाला होता. आता पुन्हा मुसळधार पावासाचा इशारा देण्यात आला आहे. तर साताऱ्यातील कोयणा आणि कृष्णा नद्यांच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाल्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली होती. आता घाट माथ्यावर पुन्हा अतिवृष्टीची शक्यता आहे. त्यामुळे हवामान खात्याने रेड अलर्ट दिला आहे.

दरम्यान मुंबई, नवी मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसाने पुन्हा दमदा हजेरी लावली आहे. मुंबई, ठाण्यात आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सांताक्रुज, पार्ले, अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली आणि दहिसर परिसरात सध्या मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. परंतु आज अचानक आलेल्या पावसाने पुन्हा एकदा नागरिकांची मोठी दाणादाण उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

Anganwadi Nutrition Food : पोषण आहारात गडबड आढळली तर खैर नाही! आदिती तटकरे यांचा अधिकाऱ्यांना इशारा

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Kissing Car : साडेतीन तासांत कारवर ३४०० 'Kisses'! रीलचा नाद पडला महागात, पोलिसांनी केली कारवाई

डोंबिवलीत भाजप अन् मनसेत 'डिजिटल युद्ध'! एआय व्यंगचित्रं आणि मीम्सच्या माध्यमातून थेट नेत्यांवर निशाणा

SCROLL FOR NEXT