Maharashtra Weather Update Saam Tv
महाराष्ट्र

Winter Alert : राज्यात थंडीचा कडाका वाढला! विदर्भातील किमान तापमान सर्वाधिक कमी; वाचा हवामानाचा अंदाज

Maharashtra Weather Alert : राज्यात किमान तापमानात अचानक घट झाल्याने थंडीचा कडाका वाढला आहे. विदर्भासह अनेक जिल्ह्यांचा पारा घसरला आहे. अंशतः वातावरणात ढगाळ हवामान जाणवत आहे. वातावरणात होणाऱ्या सततच्या चढ उताराचा फटका नागरिकांना बसत आहे.

Alisha Khedekar

  • विदर्भात किमान तापमान ७°C पर्यंत घसरल्याने थंडीची लाट

  • नागपूर, गोंदिया, धुळे, वर्धा, अमरावती, परभणी व भंडारा येथे तापमानात लक्षणीय घट

  • ढगाळ वातावरण, धुके व दवच्या स्थितीमुळे तापमानात बदल

  • IMD चा आजही किमान तापमानातील चढ-उतार व ढगाळ हवामानाचा इशारा कायम

राज्यात वातावरणात सतत बदल होताना पाहायला मिळत आहेत. पावसाने हजेरी लावल्यानंतर आज ढगाळ हवामानासह किमान तापमानात अचानक घट झाली आहे. विदर्भात किमान तापमानाचा पारा ७ अंशांपर्यंत घसरल्याने थंडीची लाट आली आहे. किमान तापमानातील चढ-उतार कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

काल म्हणजेच मंगळवारी गोंदिया येथे ७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. नागपूर येथे ७.६ अंश सेल्सिअस, धुळे येथे ८ अंश सेल्सिअस, वर्धा येथे ८.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर अमरावती, ब्रह्मपुरी, परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि भंडारा येथे १० अंश व त्यापेक्षा कमी तापमानाची नोंद झाली.

राज्यात काल गारठा वाढला होता. तुरळक ठिकाणी ढगाळ हवामान, दाट धुके आणि दव पडल्याची स्थिती कायम होती. आज राज्यात अंशतः ढगाळ वातावरणासह किमान तापमानातील चढ-उतार कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, नाशिक, निफाड, जळगाव, भंडारा या महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये थंडीचा पारा झपाट्याने वाढत आहे. दरम्यान राज्यात होणाऱ्या हवामान बदलाचा शेतपिकांवर तसेच नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नागपूरात युवा काँग्रेसचा मोर्चा; आंदोलक आक्रमक

Rahul Gandhi: राहुल गांधी VVIP नाही..., लवकर सुनावणीच्या मागणीवरून सुप्रीम कोर्ट संतापले

Weight Loss Tips: दिवाळीपूर्वी करा १० किलो वजन कमी; ६० दिवसांच्या डाएटमध्ये 'या' पदार्थांचा करा समावेश

Woman swallows 13 pens: पोटदुखीमुळे रूग्णालयात पोहोचली महिला; स्कॅन पाहून डॉक्टरही हैराण, पोटातून डॉक्टरांनी काढले 13 पेन, 5 लाकडी चमचे, मेणबत्ती

Toll Free Pass : गणेशोत्सवासाठी टोल फ्री पास कसा मिळवायचा? एका क्लिकवर जाणून घ्या

SCROLL FOR NEXT