Maharashtra winter News Saam Tv
महाराष्ट्र

Today Weather : महाराष्ट्रात जम्मू काश्मीरचा फील! तापमान घसरलं, 'या' ठिकाणाचा पारा ५ अंशावर, मुंबई-पुणेकर थंडीने गारठले

Maharashtra Winter Update : महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला असून जेऊरमध्ये किमान तापमान ५ अंशांपर्यंत घसरले आहे. पुढील काही दिवसांत गारठा कमी होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Alisha Khedekar

  • राज्यातील अनेक जिल्ह्यांत तापमान १० अंशांखाली

  • परभणी, जेऊर, निफाडमध्ये तीव्र थंडी

  • पुणे, विदर्भ, मराठवाड्यात गारठा कायम

  • पुढील काही दिवसांत थंडी कमी होण्याचा अंदाज

उत्तरेकडून येणारे शीत वारे वेगाने वाहत असल्याने महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला आहे. पुढील काही दिवसांत हा गारठा कमी होण्याची शक्यता आहे. काल परभणीत राज्यातील सर्वाधिक कमी तापमान ५.५ अंश सेल्सियस पाहायला मिळालं. तर आज मुंबई, पुणे, मराठवाडा, विदर्भात गारठा कायम असून ठिकठिकाणी थंडी पासून बचाव करण्यासाठी शेकोट्या पेटल्या आहेत.

काल म्हणजेच शुक्रवारी जेऊर राज्यातील निचांकी ५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. परभणीत ५.५ अंश, निफाड मध्ये ५.७ अंश सेल्सिअस, धुळे आणि अहिल्यानगर येथे प्रत्येकी ६.१, जळगाव येथे ६.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अहिल्यानगर, नाशिक येथे ८ अंश सेल्सिअसपेक्षा कमी, पुणे, मालेगाव, गोंदिया, यवतमाळ येथे ९ अंशांपेक्षा कमी, ‎सातारा, ‎वाशीम, भंडारा आणि ‎नागपूर येथे १० अंश व त्यापेक्षा कमी तापमानाची नोंद झाली.

किमान तापमानाचा पारा १० अंशांच्या खाली आल्यास तसेच तापमानात सरासरीच्या तुलनेत ४.५ अंशांची घट झाल्यास थंडीचा लाट, तर तापमानात ६.५ अंशांपेक्षा अधिक घट झाल्यास तीव्र लाट आल्याचे समजले जाते. शुक्रवारी जेऊर, धुळे, निफाड, जळगाव, अहिल्यानगर, परभणी, यवतमाळ येथे कडाक्याची थंडी होती. आज राज्यातील थंडीची लाट कमी होण्याची शक्यता आहे. मात्र हुडहुडी कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांतील तापमान पुढीलप्रमाणे : -

  • पुणे :- ८.३ अंश सेल्सियस

  • अहिल्यानगर :- ७.३ अंश सेल्सियस

  • धुळे :- ६.१ अंश सेल्सियस

  • जळगाव:- ६.९ अंश सेल्सियस

  • जेऊर:- ५.० अंश सेल्सियस

  • ‎‎कोल्हापूर:- १३.५ अंश सेल्सियस

  • महाबळेश्वर: - १२.२ अंश सेल्सियस

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT