आज आयएमएचे कामबंद; शिकाऊ डाॅक्टरांनी काढला कँडल मार्च  संजय राठोड
महाराष्ट्र

आज आयएमएचे कामबंद; शिकाऊ डाॅक्टरांनी काढला कँडल मार्च

यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अंतिम वर्षात शिक्षण घेणारे विद्यार्थी अशोक पाल यांची बुधवारी रुग्णालय परिसरात हत्त्या झाली होती.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

-- संजय राठोड

यवतमाळ : आयएमए च्या वतीने डॉक्टर अशोक पाल यांना आज श्रद्धांजली वाहण्यात आली. खऱ्या मारेकऱ्यांना तातडीने अटक करण्यात यावी, या मागणीसाठी शनिवार, दि. १३ नोव्हेंबरला एक दिवस कामबंद आंदोलनाचा निर्णय आयएमएने घेतला आहे. या आंदोलना दरम्यान अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत.

हे देखील पहा :

यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अंतिम वर्षात शिक्षण घेणारे विद्यार्थी अशोक पाल यांची बुधवारी रुग्णालय परिसरात हत्त्या झाल्या नंतर विद्यार्थ्यांमध्ये प्रशासनाविरोधात तीव्र संतापाची लाट पसरली आहे. या घटनेचा निषेध करत तीन दिवसांपासून विद्यार्थ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.

या घटनेतील आरोपीला अटक होईपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्णय विद्यार्थ्यांनी घेतला असून डाॅक्टर अशोक पाल यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी महाविद्यालयातील विध्यार्थी विद्यार्थिनींनी काल रात्री कँडल मार्च काढला. यावेळी जवळ पास तीनशे विद्यार्थी या कँडल मार्च मध्ये सहभागी झाले होते. हा कँडल मार्च आंदोलन स्थळावरून घटना स्थळपर्यंत गेला. त्या नंतर त्याठिकाणी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Best Bus Strike: अखेर तोडगा निघालाच! बेस्टचा संप मागे, कर्मचाऱ्यांना मिळणार २००० रुपये मासिक हंगामी वाढ

ओमराजे निंबाळकरांचं अखेर ठरलं! ठाकरेंच्या मनधरणीच्या प्रयत्नांना अपयश

मुलीला वाचवण्यासाठी बाप बिबट्याशी भिडला; मृत्यूच्या जबड्यातून चिमुकलीची सुटका

अमिताभ बच्चन यांची लेक संजय राऊतांची फॅन; खुद्द जया बच्चन यांचा खुलासा

Beed Crime: बीड हादरले! तरूणावर चाकूने सपासप वार, हॉटेलबाहेर जागीच संपवलं

SCROLL FOR NEXT