Latur News Saam TV
महाराष्ट्र

Latur News: लातूरमध्ये अवैध दारू विक्रेत्यांचा सुळसुळाट; उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

लातूर जिल्ह्यातील वाढवणा पाटी (ता. उदगीर) येथील मैत्री लंच होम ढाबा आणि जिल्ह्यात इतर विविध ठिकाणी उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने धाडी टाकल्या.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दीपक क्षिरसागर

Latur News: लातूर (Latur) जिल्ह्यातील वाढवणा पाटी (ता. उदगीर) येथील मैत्री लंच होम ढाबा आणि जिल्ह्यात इतर विविध ठिकाणी उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने धाडी टाकल्या. यावेळी २० जणांना अटक केली. याबाबत हॉटेल, ढाबा चालकासह इतरांवर गुन्हे दाखल केले आहेत. त्यांना न्यायालयात हजर केले असता, ढाबामालकाला ५० हजार रुपये, तर मद्यपींना प्रत्येकी ५०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. (Latest Latur News)

उदगीर तालुक्यातील वाढवणा पाटी येथील मैत्री लंच होम ढाब्यावर अवैध दारूविक्रीबरोबरच विनापरवाना दारू पिणाऱ्यांची वर्दळ असल्याची माहिती सुत्रांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्य पथकाला दिली. या माहितीच्या आधारे उत्पादन शुल्कच्या उदगीर (Udgir) आणि लातूर येथील पथकाने या ढाब्यावर धाड मारली. यावेळी दोन ढाबामालक आणि चार ग्राहक अशा सहा जणांना अटक करण्यात आली. गुन्ह्यामध्ये 3 हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे, तर नळेगाव, डोंग्रज, जानवळ (ता. चाकूर) आणि हेर (ता. उदगीर) येथेही धाडी टाकण्यात आल्या. याप्रकरणी चार गुन्हे दाखल केले आहेत. येथे देशी दारू १ लिटर, विदेशी दारू ४५ लिटर, असा एकूण २९ हजार ६६५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

अवैध दारू विक्री संबंधीत विभागातील अधिकाऱ्यांना लाच देऊन सुरू असल्याच्या काही घटना या आधी उघडकीस आल्या आहेत. अहमनगरमध्ये दारू विक्री सुरू ठेवण्यासाठी दोन अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगे हात पकडण्यात आले होते. दारू विक्री व वाहतूक चालू ठेवण्यासाठी ५५ हजारांच्या लाचेची मागणी करुन तडजोड अंती ३५ हजारांची रक्कम स्वीकारताना, नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दोन दुय्यम श्रेणी अधिकाऱ्यांना रंगेहाथ पकडले होते. मंगळवारी २९ जून रोजी कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे ही कारवाई करण्यात आली.

नंदू चींधू परते दुय्यम निरीक्षक आणि राजेन्द्र भास्कर कदम सहा दुय्यम निरिक्षक राज्य उत्पादन शुल्क कोपरगाव विभाग ,बाभलेश्र्वर असे दोघा लाचखोर अधिकाऱ्यांची नावे आहे. याबाबत कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर कारवाईने लाचखोर अधिकाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. त्यामुळे लातूरमध्ये झालेल्या कारवाईत देखील कोणत्या अधिकाऱ्याला लाच देण्यात आली होती का या मार्गाने तपास सुरू आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,तक्रारदार यांचा दारू विक्री व्यवसाय असून दारू वाहतूक व विक्री चालू ठेवण्यासाठी दिनांक २७ जुन रोजी आलोसे क्र १ राजेंद्र भास्कर कदम, वय ४६ यांनी मागील ११ महिन्याचे बाकी हप्त्याचे ५५,००० रुपये लाचेची मागणी करुन तडजोडी अंती ३०,००० रुपये स्वीकारण्याचे मान्य केले.

सदरची कारवाई ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, पोलिस अधीक्षक सुनिल कडासने,अप्पर पोलीस अधीक्षक, नारायण न्याहळदे, पोलिस उपअधीक्षक सतीश भामरे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार, पोलिस निरिक्षक संदीप साळुंखे, पो.हवा/ डोंगरे, पो.ना./ इंगळे, पो. ना/नितीन कराड, चापो.ह विनोद पवार यांच्या पथकाने केली असून सदर कारवाई मुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांचे नागरिकांमधून कौतुक होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: कोकणात ठाकरे गटाला भलं मोठं खिंडार; विश्वासू समर्थकांचा पक्षाला 'जय महाराष्ट्र'

Ganesh Visarjan 2025 : माझ्या बाप्पाला घेऊन जाऊ नका; निरोप देताना चिमुकलीला अश्रू अनावर, VIDEO

Maharashtra Politics : एवढा पैसा कुठून आला काका? मंत्री सरनाईकांच्या टेस्ला कार खरेदीवर मराठी अभिनेत्याचा सवाल

Anant Chaturdashi 2025 live updates : गणपती विसर्जन मिरवणुकीत मंत्री गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांसोबत ठेका धरला

Ganesh Visarjan 2025: आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच 'गणेश' गिरणा पात्रात बुडाला, गणेश विसर्जनावेळी राज्यभरातील ५ ठिकाणी विपरित घडलं, १० जण बुडाले

SCROLL FOR NEXT