MNs Saam TV
महाराष्ट्र

MNS: शिर्डीत मनसे नेत्यांकडून ईफ्तार पार्टीचं आयोजन

राज्यामध्ये मशिदींच्या भोंग्यावरून राजकारण तापलेला असताना शिर्डीत मात्र साई बाबांनी दिलेल्या 'सबका मालिक एक' हा संदेश जपल्याचं पाहायला मिळत आहे.

गोविंद साळुंके, साम टीव्ही, शिर्डी

शिर्डी : राज्यामध्ये मशिदींच्या भोंग्यावरून राजकारण तापलेला असताना शिर्डीत मात्र साई बाबांनी दिलेल्या 'सबका मालिक एक' हा संदेश जपल्याचं पाहायला मिळत आहे. मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सध्या सुरु आहे. त्यानिमित्त मुस्लिम बांधवांना शिर्डीतील मनसेचे नेते (MNS Leader) दत्तात्रय कोते यांनी इफ्तार पार्टीचे आयोजन केलं होतं यावेळी मनसे कार्यकर्ते सह मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

एकीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) मशिदीवरील भोंगे उतरविण्यासाठी जोर धरला असतांना मनसे विरुद्ध मुस्लिम असे वातावरण तयार झाले आहे. मात्र, सबका मालिक एकचा संदेश देणाऱ्या साईबाबांच्या शिर्डीत (Shirdi) मनसेने मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे (Iftar party) आयोजन केले आहे. राज्यात मनसे विरुद्ध धार्मिक स्थळावरील भोंगे असे वातावरण तापलेले आहे. भोंग्यामुळे असे हे वातावरण तापलेले असतानाच दुसरीकडे  साईंच्या शिर्डीत सामाजिक सलोखा राखण्याचे कामही मनसेचे कार्यकर्त्याकडून केले जात असल्याचं पाहायला मिळत आहे.

दरम्यान, आज औरंगाबाद (Aurngabad) येथे राज ठाकरे यांची जंगी सभा होणार आहे. तसेच मुंबईमध्ये विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची देखील सभा होणार आहेत याकडे सर्वांच लक्ष लागून राहिलं आहे. तसंच राज यांनी मागील दोन्ही सभांमध्ये मुस्लिम समाजाच्या विरोधात भूमिका घेणारी वक्तव्य केली असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. त्यामुळे आज राज यांच्या सभेला पोलिसांनी सशर्त परवानगी दिली असून ते आज काय बोलणार याकडे पोलिस प्रशासनासह राज्यभरातील मनसैनिकांच लक्ष लागून राहिलं आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: युद्धजन्य परिस्थितीमुळे भारतात गॅस धारकांना फटका

Edible Oil Price Hike: युद्धामुळे सर्वसामान्यांच्या घरात उडाला भडका, खाद्यतेलाच्या किंमतीत १२५ रुपयांनी वाढ

Taak Masala Recipe: ताक बनवण्याचा मसाला घरी कसा बनवायचा?

Viral Video: भर रस्त्यात रेड्याचा उच्छाद; स्कूटीस्वाराला हवेत उचलून आपटलं, व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क

Siddharth Chandekar: सिद्धार्थ चांदेकरला महानगर गॅसच्या नावाने आला फ्रॉड कॉल; अभिनेत्याने कॉलरला म्हणायला लावली मराठी कविता

SCROLL FOR NEXT