MVA On Ladki Bahin Yojana  Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: बहीण लाडकी, विरोधकांना धडकी? मविआची दुप्पट पैसे देण्याची घोषणा

Ladki Bahin Yojana : विधानसभेपूर्वी महायुतीने आणलेल्या लाडकी बहीण योजनेसाठी पैसे कुठून आणणार असा सवाल विरोधक उपस्थित करत आहेत. मात्र एकीकडे विरोध करत असतानाच आता विरोधकांनाही या योजनेची भुरळ पडलीय.

Saam Tv

भरत मोहळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

विधानसभेपूर्वी महायुती सरकारने आणलेल्या लाडक्या बहीण योजनेला मोठा प्रतिसाद मिळतोय. या योजनेचा पुण्यात शुभारंभ झाला. तर या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी सरकार लाडक्या बहीणींना धमक्या देत असल्याचा आरोप सुप्रिया सुळेंनी केलाय. तर क्रांतीकारी योजनेमुळे विरोधकांना नैराश्य आल्याचा पलटवार सुनील तटकरेंनी केलाय.

लाडकी बहीण योजनेला मिळणारा प्रतिसाद पाहून काँग्रेसने कर्नाटकच्या धर्तीवर राज्यात गृहलक्ष्मी योजना सुरु करून योजनेचे पैसे दुप्पट करणार असल्याचं जाहीर केलं. तर आता काँग्रेसपाठोपाठ ठाकरे गटानेही काँग्रेसची री ओढत सरकार आल्यास लाडकी बहीण योजना बंद न करता महिन्याला 3 हजार रुपये देण्याची घोषणा केलीय.

राज्यावर 7 लाख कोटींपेक्षा जास्त कर्ज आहे. त्यातच लाडकी बहीण योजनेमुळे राज्याची अर्थव्यवस्था आणखी खोलात जाईल, अशी टीका विरोधी पक्षांनी वारंवार केली होती. मात्र या योजनेला मिळणा-या प्रतिसादामुळे विरोधकांनीही चांगलाच धसका घेतलाय.

त्यामुळे रिकाम्या तिजोरीकडे दुर्लक्ष करत विरोधकांनीही या योजनेत दुप्पट वाढ करण्याचं जाहीर केलंय. सरकारला कडकी असली तरी लाडक्या बहिणीची विरोधकांना धडकी भरलीय एवढं मात्र नक्की...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अल निनोमुळे राज्यात पाणी टंचाईची भीषण समस्या

Mumbai Toll: मुंबईकरांचा प्रवास महागला, टोलच्या दरात मोठी वाढ; नवे दर किती?

Walking Benefits: १० मिनिटं की ६० मिनिटं; दररोज किती चाललं पाहिजे? तुमच्या आरोग्यासाठी दोघांपैकी काय ठरेल फायदेशीर?

Accident News : भाजपच्या बड्या नेत्याच्या कारचा भीषण अपघात! भरधाव ट्रेलरने दिली जोरदार धडक

Jeera water vs saunf water: जीरा की बडीशेप...; सकाळी-सकाळी कोणतं पाणी पिणं तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर

SCROLL FOR NEXT